तो ही नाही ती ही नाही
मग नक्की मी आहे तरी कोण ?
मुली सारखी दिसत नाही
मुला सारखी चालत नाही
चेहर्यावर दाढी मिश्या
हातामध्ये बांगड्या
माझेच मला कळत नाही
तो ही नाही ती ही नाही
मग नक्की मी आहे तरी कोण ?
नसे मातृत्व मजला तरीही
नसे पुरुषत्व मजला तरीही
दोघांचेही अस्तित्व माझ्यामधी
बघा माझ्याही हृदयात झाकूनी कधी
तीव्र वेदना होतात त्यावेळी
हिणवता तुम्ही आम्हाला नाना नावानी
माझेच मला कळत नाही
तो ही नाही ती ही नाही
मग मी नक्की आहे तरी कोण ?
मी विष्णूचं रूप नाही मी लक्ष्मीचं रूप नाही
मी शंकराचं रुप नाही पार्वतीचं रूप नाही
मी तर देवाने बनवलेली खास प्रतिकृती
मज घडवताना विचारात पडले असतील ब्रह्मांडही
आहे मी स्वीकारलेलं जे रूप दिले आहे अद्भुत देवांनी
तरीही प्रश्न उरतोच मनाशी
माझेच मला कळत नाही
तो ही नाही ती ही नाही
मग नक्की मी आहे तरी कोण ?
कवयित्री
नेहा नितीन संखे ( बोईसर )
समन्वयक – पालघर जिल्हा