Homeमुक्त- व्यासपीठनवरात्र आणि उपासना…..!!!

नवरात्र आणि उपासना…..!!!

(सदरहू पोस्ट लेखकाच्या नावासह कुठेही शेअर करु शकता. कोणत्याही गुरुजींनी/भटजींनी/ज्योतिषांनी स्वत:च्या नावासह पोस्ट शेअर केल्यास चारचौघात तुमचेच हसे होईल याची जाणीव असू द्यावी. तसा मूर्खपणा करणे टाळावे. सदरहू पोस्टमधील अनेक गोष्टी दैवी आदेशानुसार सोशल मिडियावर शेअर करण्याची परवानगी घेतली जाते याची नैतिक जाणीव ठेवावी.)

७ ऑक्टोबर २०२१ (गुरुवार) रोजी अश्विन नवरात्र सुरू होत असून १५ ऑक्टोबर २०२१ (शुक्रवार) रोजी दसर्‍याला नवरात्र समाप्त होत आहेत. या काळात सर्वसामान्य भक्तांनी व विशेषतः देविभक्त किंवा आदिशक्तीच्या उपासकांनी पुढील उपासना करणे योग्य किंवा क्रमप्राप्त आहे. ही उपासना माझ्या आजवरच्या २८ वर्षाच्या ज्योतिषशास्त्रिय अभ्यासानुसार व आध्यात्मिक साधनेनुसार सुचवितो आहे.

|| ऐं ऱ्हीं क्लीं चामुंडायै विच्चे ||

या नवार्ण मंत्राचा रोज जमेल तितका जप (किमान १०८ जप तरी करावा आणि कमाल कितीही चालेल) सकाळी स्नानानंतर अवश्य करावा. देवघरातील दुर्गा, कुलस्वामिनी किंवा कोणत्याही देवीची मूर्ती किंवा फोटोची पूजा करून, देवीचे स्मरण करून मग जपाला सुरूवात करावी. जप सलगपणे आणि मनःपूर्वक करावा.

या मंत्राला “नवार्ण मंत्र” म्हणतात. यातील एकूण अक्षरे ९ आहेत. काही मंडळी या मंत्राआधी ॐ लावून म्हणतात तसे न करता केवळ वर दिलेल्या मंत्राचाच जप करावा. या मंत्राचा अर्थ म्हणजे.

ऐं = सरस्वती स्वरूप (Pronunciation is Aim)

ऱ्हीं = लक्ष्मी स्वरूप/ दुर्गा (Pronunciation is Rheem)

क्लीं = महाकाली स्वरूप (Pronunciation is Kleem)

अशा, जिने चंड-मुंड या राक्षसांचा नाश केला त्या चामुंडेला मी शरण जातो आहे.

1) श्रीदेविउपासना सुरू असताना १० दिवस मांसाहार, मद्यपान अजिबात करू नये. १० दिवस रोज स्नान अवश्य करून शरीराने शुचिर्भूत व मनाने आनंदी रहावे. पण एखाद्या स्त्रीला मासिकधर्म,अडचण असेल तरीही तिने जप करावयास हरकत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण, आदिशक्ति ही मी मातृस्वरुप मानतो. आणि मासिकधर्म हा मातृत्वाचे किंवा त्या अवस्थेचे एक महत्वाचे अंग आहे, ते देविउपासनेत मी वर्ज्य समजत नाही. सोयरसुतक असेल तरीही मानसिक जप केल्यास हरकत नाही.

2) या नवरात्र काळात आपल्या कुलस्वामिनीचे दर्शन घेणे जास्त शुभ असते. तिच्या मुळ क्षेत्री किंवा उपक्षेत्री जाऊन प्रार्थनापूर्वक दर्शन, ओटी, अभिषेक हे विधी करणे केव्हाही उत्तम…अनेक कुटुंबात कुलाचार-कुळधर्म याच नवरात्रात केले जातात. ते करावेत.कुलस्वामिनी माहिती नसेल तर तुम्ही ज्या गावात रहात आहात तिथल्या कोणत्याही देविमंदिरात जाऊन ओटी वगैरे भरल्यासही चालू शकेल.

3) या नऊ दिवसांत एखाद्या गरीब, गरजू स्त्रीची ओटी भरून (पुरुष साधकांनी पत्नी किंवा अन्य नातेवाईक स्त्री करवी ओटी भरावी) तिला अन्नवस्त्र, दक्षिणा देऊन तिचा मान राखावा…ओटी भरल्यानंतर त्या स्त्रीला आदरपूर्वक खाली वाकून नमस्कार करावा.

4) रहात्या वास्तूत चांगल्या व जाणकार गुरुजींकरवी श्रीदूर्गासप्तशतीचा साधा किंवा हवनयुक्त पाठ करून घ्यावा. हा पाठ घरातील सर्वांच्या उपस्थितीत व्हायला हवा. हा पाठ शक्यतो घटस्थापना, शुध्द पंचमी, सप्तमी, अष्टमी या दिवशी केल्यास अधिक उत्तम.

आणि अतिशय महत्वाचे म्हणजे या नवरात्रीत साधकांसाठी देवीचे एक अतिशय प्रभावी स्तोत्र देत आहे. हे स्तोत्र आदिशक्ती श्रीदूर्गेशी संबंधित आहे. त्यामुळे नवरात्रीचे नऊ दिवस रोज सकाळी आंघोळीनंतर किंवा संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी हातपाय धुवून अशा प्रकारे तुम्ही स्तोत्रवाचन करु शकता. सकाळी व संध्याकाळी मिळून असे एकूण किमान ३ ते कमाल ९ पाठ होणे क्रमप्राप्त आहे. हे स्तोत्र अतिशय प्रासादिक असून शक्ती,यश,स्थैर्य आणि कौटुंबिक सौख्यात वृध्दीकारक आहे.
@सचिन मधुकर परांजपे

॥ #श्रीदुर्गाष्टोत्तर_शतनामस्तोत्र ॥

(दूर्गेच्या १०८ नावांचे स्तोत्र)

॥ॐ श्री दुर्गा परमेश्वर्यै नमः ॥

अस्यश्री दुर्गाष्टोत्तर शतनामस्तोत्र मालामन्त्रस्य
महाविष्णु महेश्वराः ऋषयः,
अनुष्टुप्छन्दः, श्रीदुर्गापरमेश्वरी देवता,
ह्रां बीजं, ह्रीं शक्तिः, ह्रूं कीलकं,
सर्वाभीष्टसिध्यर्थे जपहोमार्चने विनियोगः ।

ॐ सत्या साध्या भवप्रीता भवानी भवमोचनी ।
आर्या दुर्गा जया चाध्या त्रिनेत्राशूलधारिणी ॥

पिनाकधारिणी चित्रा चंडघंटा महातपाः ।
मनो बुद्धि रहंकारा चिद्रूपा च चिदाकृतिः ॥

अनन्ता भाविनी भव्या ह्यभव्या च सदागतिः ।
शांभवी देवमाता च चिन्ता रत्नप्रिया तथा ॥

सर्वविद्या दक्षकन्या दक्षयज्ञविनाशिनी ।
अपर्णाऽनेकवर्णा च पाटला पाटलावती ॥

पट्टांबरपरीधाना कलमंजीररंजिनी ।
ईशानी च महाराज्ञी ह्यप्रमेयपराक्रमा ।
रुद्राणी क्रूररूपा च सुन्दरी सुरसुन्दरी ॥

वनदुर्गा च मातंगी मतंगमुनिकन्यका ।
ब्राम्ही माहेश्वरी चैन्द्री कौमारी वैष्णवी तथा ॥

चामुंडा चैव वाराही लक्ष्मीश्च पुरुषाकृतिः ।
विमला ज्ञानरूपा च क्रिया नित्या च बुद्धिदा ॥

बहुला बहुलप्रेमा महिषासुरमर्दिनी ।
मधुकैठभ हन्त्री च चंडमुंडविनाशिनी ॥

सर्वशास्त्रमयी चैव सर्वधानवघातिनी ।
अनेकशस्त्रहस्ता च सर्वशस्त्रास्त्रधारिणी ॥

भद्रकाली सदाकन्या कैशोरी युवतिर्यतिः ।
प्रौढाऽप्रौढा वृद्धमाता घोररूपा महोदरी ॥

बलप्रदा घोररूपा महोत्साहा महाबला ।
अग्निज्वाला रौद्रमुखी कालारात्री तपस्विनी ॥

नारायणी महादेवी विष्णुमाया शिवात्मिका ।
शिवदूती कराली च ह्यनन्ता परमेश्वरी ॥

कात्यायनी महाविद्या महामेधास्वरूपिणी ।
गौरी सरस्वती चैव सावित्री ब्रह्मवादिनी ।
सर्वतत्त्वैकनिलया वेदमन्त्रस्वरूपिणी ॥

इदं स्तोत्रं महादेव्याः नाम्नां अष्टोत्तरं शतम् ।
यः पठेत् प्रयतो नित्यं भक्तिभावेन चेतसा ।
शत्रुभ्यो न भयं तस्य तस्य शत्रुक्षयं भवेत् ।
सर्वदुःखदरिद्राच्च सुसुखं मुच्यते ध्रुवम् ॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
कन्यार्थी लभते कन्यां कन्या च लभते वरम् ॥

ऋणी ऋणात् विमुच्येत ह्यपुत्रो लभते सुतम् ।
रोगाद्विमुच्यते रोगी सुखमत्यन्तमश्नुते ॥

भूमिलाभो भवेत्तस्य सर्वत्र विजयी भवेत् ।
सर्वान्कामानवाप्नोति महादेवीप्रसादतः ॥

कुंकुमैः बिल्वपत्रैश्च सुगन्धैः रक्तपुष्पकैः ।
रक्तपत्रैर्विशेषेण पूजयन्भद्रमश्नुते ॥

(या स्तोत्राची संख्या ही किमान ३ वेळा आहे. एका दिवसात, २४ तासात जास्तीत जास्त ९ वेळा हे स्तोत्र वाचन करावे. गर्भवती स्त्रियांनी मात्र एकदा वाचन केले तरी पुरेसे आहे. त्यांना ३ किंवा ९ पाठाचे बंधन नाही)

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

Previous article
Next article
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular