विळखा…..

माझी मुलगी co – education शाळेत होती. तिच्या ग्रुप मध्ये मुलेमुली सर्वच. हुशार पण मस्तीखोर ग्रुप अशी ओळख शाळेत. शाळे व्यतीरीक्त क्लासेस, कधी कोणाचा वाढदिवस ही असेच.
इथली रंगपंचमी धूळवड दिवशी असते. तर सगळे एकत्र रंग खेळणार होते एका मित्राच्या बिल्डींग मधे.
नर्सरी पासूनचे क्लासमेट, त्यामुळे आम्ही बहुतेक मम्मी लोकं पण चांगल्याच मैत्रिणी झालेलो. तर तिला घ्यायला 5,6 मुलेमुली आल्या. सर्व शुभेच्छा देऊन पाया पडले त्यातल्या एकाला पाहून मी नकळत थोडी अस्वस्थ झाले. तसं थोडंफार नाव वगैरे माहिती होती. पण संपर्कात नसे इतरांच्या सारखा. त्याचे वागणे काहीतरी असंबद्ध वाटत होते. लांब रहात होता म्हणून घरच्यांशी संपर्क न्हवता. आईबाबा जाॅब करत. हा आणी मोठी बहीण घरी असायचे. मी थोडी चौकशी केली तर थोडावेळ खेळून तो त्याच्या बिल्डींग मधे जाणार होता. मुलगी घरी आल्यावर तिला बोलले मी, स्वामीचे वागणे विचित्रच वाटले. तोंडाला वास वगैरे न्हवता. पण तो थोडा स्वतःच्या कंन्ट्रोल मधे नाही असे वाटले. नंतर विसरूनही गेले.
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी हा ग्रुप थोडा टाईमपास करुन काही खाऊन यायचे म्हणून गेला. घरी आल्यावर मुलगी रडायला लागली. मी हदरले काही कळेना. डॅडी स्तब्ध. तर म्हणे त्याला हिच्यात इंटरेस्ट होता. आणी ही रीस्पाॅन्स देत नाही म्हणून तो व्यसनाधीन झाला, असा आरोप त्याच्या मीत्रांनी केला होता. कसलेसे चाॅकलेट खा म्हणून जबरदस्तीने देत होते. आपल्यामुळे तो असा झाला म्हणून ही भावनिक झाली पण नशीब मी तिला सावध केले होते होळीला आणी तिने ते छोटेसे चाॅकलेट, संशय आला म्हणून खाल्ले नाही. नंतर समजले तो पुर्वीपासूनच होता त्यात. अगदी बाबांच्या बाटलीतले मद्य काढून घेऊन पाणी टाकायचा. पण ही अशी चाॅकलेटस् कोण पुरवत होते आणी त्यासाठी पैसे कुठून यायचे ते समजले नाही. काय करु शकले नाही. खुपच वाईट वाटले.
सारेच अनाकलनीय. काय ही शाळेची मुलं, कुठून येते हे सगळे, कोण पुरवते इतक्या लहान वयात हे..
मी तिला समजावले. की तुझ्यावर प्रेशर टाकण्याचा प्रकार होता तो. आणी शांत केले. ती म्हणाली माँ मी ही आज पाहिले तो असाच काहीतरी बोलत वागत होता. मला आठवले तु जे सांगीतले होते ते मग आम्ही निघून आलो.
एकदा एस्सेल वर्ल्ड ला जाणारा, 4,5 मुलींचा ग्रुप इतरांची वाट पहात होता. मी एक्टीवा पार्क करायला जागा शोधत होते. त्यांच्या बाजूला पार्क केली पण स्मोकिंग करणारी एक 17/ 18 वर्षाची मुलगी त्यात होती. मला खुपच त्रासदायक वाटतो तो वास. मग मी बोललेच तिला पब्लिक प्लेसवर का स्मोक करतेयस. टाक आधी खाली. ती अस्वस्थ झाली. तिच्याबरोबरच्या मुली पण, त्या ही विचलीत झाल्या. त्या स्मोक करत न्हवत्या. ती माझ्याशी वाद घालू लागली तुम्हाला काय करायचेय.. जा तुम्ही.. मी म्हटलं स्मोकिंग न करता तुझा तो धूर मला त्रासदायक ठरतोय. चल.. 1 मिनीटावर खाडीच्या गेट जवळ पोलीस बिट होते. मग तिने टाकून दिली सिगरेट. पण प्रत्येक वेळी हे शक्य होत नाही. कीती जणांना बोलणार. तिथून दूर जाणे हेच सोयीस्कर वाटते बर्‍याच जणांना.
आज सर्रासपणे सगळीकडे हे विष पसरतेय. मुंबई सारख्या शहरात अनेक मुले मुली रस्त्यावर सिगरेट,दारु सारखी व्यसनं करताना दिसतात. दुकानात जाऊन खरेदी करताना दिसतात.
बर्‍याच महिन्यांपूर्वी रात्री फिरताना एका मुलीला बाईकवरून दोन मुलांच्या मधे बसलेले पाहिले. मागच्याने धरले होते तिला. पण तिला उलटी आली आणी बाईक आमच्या पासून काही अंतरावर थांबली. झोक जात होते अक्षरशः. 15 ते 16 वयाचीच असावीत तिघे. माझ्या मनात प्रश्नांचे काहूर माजले . कुठे रहात असेल? आईवडिलांना कल्पना असेल का या प्रकाराची? घरी कशी जाईल? असा कसा तोल सोडला असेल?? 11 वाजत आले होते घरचे कसे गप्प बसले असतील??
कीतीतरी अनुत्तरीत प्रश्न…. मीस्टरांना बोलले जाऊ का? चौकशी करु का … पण ते बोलले नको, तिघेही नशेत आहेत. वाटत तर असे होते कार मधे घ्यावे आणी घरी नेऊन सोडावे तिच्या. पण नाईलाज होता.
आमच्या लहानपणी असे कधी ऐकलेच न्हवते. का तेव्हा हे असे प्रकारच न्हवते…. का बहुतेकांची आई घरी असायची म्हणून… . का तेव्हा गरजा इतक्या वाढल्या न्हवत्या.


आजकाल आईवडील दोघांनी काम करणे काळाची गरज बनली आहे. घरच्या गरजा, मुलांचे शिक्षण, राहाणीमान, महागाई आणी हो उच्च शिक्षण घेऊन करीयर हवेच. मुलामुलींना आपण त्यासाठीच तर उच्च शिक्षण देतो जेणेकरून स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. पण मग काय, कसे, कोणाचे चुकते??? मला वाटते वाट्टेल तसा पैसा मुलांना द्यायला नको. परीस्थितीची जाणीव लहानपणापासून द्यायला हवी. तसेच लहानपणापासूनच अश्या गोष्टीचे दुष्परिणाम काय ते छोटे छोटे व्हिडिओ, चित्र यांच्या सहाय्याने समजावून सांगायला हवेत. त्यामुळे शरीराची हानी कशी होते. मानसिक स्थिती कशी बिघडते हे कळत नकळतपणे त्यांना समजवायला यला पाहिजे. अश्या उदाहरणावरून घरातील इतर मोठ्या व्यक्तींशी दुष्परीणामांची चर्चा केली पाहिजे. ती त्यांच्या कानावर जास्त प्रमाणात जायला पाहिजे. मी हेच केले. सर्वच बाबतीत. आणी मुलांशी मैत्री केली. आधीकार गाजवायचा तेव्हाच गाजवला. रागावणे प्रसंगी मार पण हलकासा.पण मुभा ही दिली. त्याचा सुपरीणाम झाला हे सुदैव. पण दुष्परीणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नको त्या वयात, जास्त माहिती मिळून अकर्षण वाढण्याचा धोका ही नाकारता येत नाही.
कायद्याने बंधने असूनही असे प्रकार सर्रास चालतात. बरं!! त्यासाठी गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही. ह्या विळख्यात समाजातील सर्व स्तरातील मुलं, मुली, प्रौढ, अशिक्षित, उच्च शिक्षित अडकत आहेत. आज मीडीयामधे गाजणारी प्रकरणे आहेत तशी मध्यमवर्गीयांमधे आहेत. मेडीकल, इंजीनियरिंग चे विद्यार्थि अप्रत्यक्षपणे माझ्या माहीतीत आहेत. स्ट्रेस होतो म्हणे त्यांना अभ्यासाचा. तसेच रेल्वे रुळांच्या बाजूला चालणारे प्रकार,अगदी भिकारी लोकंही आहेत. खायची वंचना मग ह्यासाठी पैसे कुठून येतात. दिवसभर भाजी विकणारा मुलगा रात्री ड्रग्ज च्या नशेत असतो. कसं काय…
सर्वच ड्रगीस्ट नसतात पण हे प्रकार वाढलेत हे नक्कीच. ही पिढी पुढच्या पिढीला जन्माला घालणार.. मग आपल्या मुलांना काय आदर्श देणार? हा ही प्रश्न मला राहून राहून पडतोच. का आपल्या अनुभवातून सहीसलामत बाहेर पडून एक सुद्दृढ पिढी निर्माण करणार. खरंच!! खरंतर कोणी ह्या विषाची परीक्षा घेऊच नये. आणी दुर्दैवाने असे काही झाले तर लवकरात लवकर ह्या विळख्यातून सहीसलामत बाहेर पडायलाच हवे. तर आणी तरच एक आशादायक सुदृढ समाज निर्माण होईल. आणी तो व्हावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻

लेखिका- रश्मी हुले
बोरिवली ( मुंबई )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular