Homeमनोरंजननिता अंबानी यांना साडी नेसून देण्याऱ्याचा पगार जाणून घ्या..

निता अंबानी यांना साडी नेसून देण्याऱ्याचा पगार जाणून घ्या..

मुबंई ( न्यूज नेटवर्क ) – देशातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या सौभाग्यवती निता अंबानी या नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे एक एक शौक असे आहेत की सर्वसामान्य लोक त्याचा स्वप्नातही विचार करू शकत नसेल. त्यांच्याकडे डिझायनर साड्या , दागिन्याचे कलेक्शन , लहेंगे आहेत. त्या फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जातात. कार्यक्रम कोणताही असो जर त्या कार्यक्रमात असतील तर चर्चा आणि सर्वांच्या नजरा नीता अंबानी यांच्याकडेच असतात. तुम्ही काही पार्टी किंवा कार्यक्रम मधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले असतीलच…
नीता अंबानी यांच्या डिझायनर साड्याच करोडो रुपयांच्या नसून साडी नेसून देण्यासाठी सुद्धा त्या भारी रक्कम देतात. आणि फक्त निता अंबानीच न्हवे तर अनेक अभिनेत्री ही डॉली जैन यांच्याकडूनच साड्या नेसून घेतात . चर्चा अशी आहे की निता अंबानी या फक्त डॉली जैन यांच्याकडूनच साड्या नसतात त्या स्वतः कधीच नेसत नाहीत. आणि याबाबतीत एक दोन नाही तर 15 -20 लाख रुपये एका वेळी फी आकारतात म्हणे.. पण हे नक्कीच की त्या भरी मोठी फी आकारतात.
डॉली जैन साडी नेसून देण्यासाठी इतक्या माहीर आहेत की त्या एकच साडी 325 वेगवेगळ्या पद्धतीने नेसवून देतात. त्यात एक वैशिष्ट्य म्हणजे त्या खूप कमी वेळात साडी नेसवुन देण्यात पटाईत आहेत. त्यांच्या साडी नेसून देण्याच्या कलेवर अभिनेत्री व्यावसायिक किंवा उद्योजकीय पाश्वभूमी असणाऱ्या महिला वर्ग , तसेच काही राजकीय महिला सुद्धा आघाडीवर आहेत.

संदर्भ – tv9

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular