पंचनामा


आपणांस सर्वांना माहीत असणारा रोजच्या जीवनात आपला संबंध केव्हा ना केव्हा तरी आपणांस या पंचनामा प्रकियेला सामोरे जावे लागते घटना कोणतीही असो घडलेल्या घटनेचा तात्काळ पंचासमोर केलेली तपासाची किंवा तपासाचे नोद पत्र तयार करणे याला पंचनामा असे म्हणतात पंचांची नेमणूक करणारा म्हणजे पंचनामा होय झालेली घटना भयानक प्रकार यांचा ही घटना कशामुळे झाली. घटना झाली त्यावेळी तिथे कोण उपस्थित होते. घटना होताना वेळ काळ कोणता होता. समजा
खुनाचा पंचनामा करताना. खुन झालेली व्यक्ती कोणत्या गावची रहिवासी आहे. खून कोणत्या जागी झाला आहे. मयताच्या अंगावरील पेहराव कोणता होता. घटनास्थळापासून लोकवस्ती किती अंतरावर आहे. खून करण्यासाठी कोणते शस्त्र वापरले गेले आहे. खून एकाने केला का त्यात अन्य लोकांचा समावेश आहे. मयताच्या अंगावरील दागिने लंपास झाले आहेत काय. मयतावर किती वार आहेत कोठे आहेत. यानंतर मयताचे नाव काय मयताचे सगेसंबधी कोण आहे का. मयत कोणत्या दिशेत कश्या अवस्थेत पडले आहे. मयताजवळ सामान साहित्य काय आहे. आसपास चौकशी तपास सुरू करणे. अशी विविध प्रकारची माहीती व तपास केला आहे त्यासाठी सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे म्हणून पंचनाम्यावर पंचांच्या सह्या घेतल्या जातात. की सदर घटनेचा पंचनामा आमच्या निदर्शनात झाला आहे. आम्ही उपस्थित होतो. त्यामुळे या पंचनाम्यासाठी कोणताही पुराव्यांची गरज भासत नाही पोलिस प्रशासन असो किंवा अन्य कोणत्याही विभागाने कोणत्याही घटनेचा पंचनामा करताना पंचांच्या सह्या घेणे गरजेचे आहे.
परवाच आपल्याकडे संतधार पडणारा पाऊस यामुळे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात जागोजागी महापूर आला कित्येक गावच्या गावं पाण्याखाली गेली कित्येक लोकांना. कित्येक जनावरांना सुरक्षित जागी स्थलांतर करण्यात आले. महापुराचा फटका आपणास. 2005/2014/2019/2021 असा वेळोवेळी आपणांस बसला आहे. नदिकाठची गावे येथे राहणारे लोक जनावरांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करावा लागतो शासन आपली जबाबदारी पार पाडते अगोदर एक महिना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देते पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि संबंधीत पुरामुळे निर्माण होणा-या परिस्थितीला शासनाला दोष देतात. वेळोवेळी आपणांस शासनाच्या मदती आगोदर आजुबाजुला असणारी शहरें यातून. पाणी. अन्न धान्य. कपडे. साबन.अंथरूण पांघरूण. अशी विविध जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आपणांस केला जातो. याचा अनुभव आपण 2019 ला घेतला आहे. त्यात सुध्दा बोगस लाभार्थी की ज्याच्या घरात नव्हे तर घराच्या उंबरठ्यावर सुध्दा पाणी येत नाही अशी लोक पूरबाधित लोकांसाठी येणारा लाभ आर्थिक असो अथवा जीवनावश्यक वस्तूंच्या रूपात लाभ लाटताना आपण बघतो. पूरग्रस्त भागातील लोकांसाठी आपल्या पश्चिम महाराष्ट्रात बरिच दानशूर व्यक्ती आहेत हजारों रुपये खर्च करून मदत देणारे पण हाच लाभ वाटप करणारे सापेक्ष पणे करत नाहीत. एकादी जीवनावश्यक वस्तू घेवून गाडी आली की गावातील काही मंडळी आमच्यात वस्तू ठेवा तुम्हाला वाटप करता येणार नाही कारण गावात पाणी आहे अशी उत्तरे दिली जातात. आणि चार लोक बोलावून जीवनावश्यक वस्तू किट देऊन फोटो काढला जातो आणि शिल्लक सर्व जीवनावश्यक वस्तू दाबून ठेवल्याचे आपण बघतो. मा जिल्हाधिकारी साहेब यांनी 2019 ला अशयाप्रकारे कोणताही गैरप्रकार करणार्या विरोधात कारवाई आदेश दिला होता. वरील प्रमाणे सर्व प्रकारांचा अर्थ असा होतो की. *ज्याचे हातात काठी म्हैस त्याची * असे म्हणले तर वावगे ठरणार नाही
आपल्याकडे नैसर्गिक आपत्ती. महापूर व्यवसायिक मदत. महापूरात वेढलेल्या इमारती घरांची पडझड. जनावरांच्या गोठ्याची पडझड. दुष्काळात जनावरांच्या छावण्या. वाहून गेलेल्या जनावरांचा पंचनामा. मृतदेह सापडलेल्या जनावरांचा पंचनामा. शेती पिक नुकसान पंचनामा. शेत किंवा घरात माती गाळ वाळू जमा झाल्याचा पंचनामा. अशा विविध भयानक भयावह परिस्थितीचा वेळेनुसार पंचनामा करण्याचा आदेश संबंधित प्रशासन सापेक्ष व स्वच्छ असे पंचनामे करून खरोखरच नुकसान ग्रस्त लोकांना त्यांचे झालेले नुकसान यासाठी शासन निर्णयानुसार नियमानुसार भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न शासन व अधिकारी व कर्मचारी हे करत असतात वरिल प्रमाणे कोणतीही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आली असल्यास पंचनामे करण्यासाठी शासनाने काही नियम अटी घालून दिल्या आहेत. त्यानुसार पंचनामे झाले पाहिजेत. घर. शेती. मयत व्यक्ती. मयत जनावरं. व्यवसाय. सानुग्रह अनुदान. याचे पंचनामे करण्यासाठी ग्रामीण भागासाठी पंचायत समिती. जिल्हा परिषद. ग्रामपंचायत. यातून अधिकारी व कर्मचारी निवडले जातात. शहरी भागासाठी नगरसेवक. नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी. निवडलेले जातात. यांना सहकार्य करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक. सरपंच उपसरपंच पोलिस पाटील. यांनी या अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य करावे. कारण बाहेर गावाहून आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना गावात कोणाचें किती नुकसान झाले आहे हे माहीत नसते. त्यामुळे गावातील पदाधिकारी यांना गावाची माहिती असल्यामुळे यांनी संबंधितांना मदत करणे गरजेचे आहे. शासनाने पूरग्रस्त भागातील लोकांना आपल्या नुकसानभरपाई साठी अर्ज करण्याची तारीख जाहीर केल्यावर लोकांची गडबड गोंधळ उडतो. आणि लोक नुकसानभरपाई मिळण्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात करतात. ग्रामपंचायत मध्ये संबंधीत पूरग्रस्त लोकांचे अर्ज एकाजागी बसून गोळा केले जातात त्या अर्जाना पोच नाही कोणताही इन्व्हट नंबर नाही काय उपयोग आहे का*. पंचनामा करण्यासाठी एका जागेवर बसून कोणताही अधिकारी व कर्मचारी नुकसानभरपाई अर्ज स्विकारू शकत नाही कायद्यानुसार असे कृत्य करणारा अधिकारी शासनाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्ह्यास पात्र आहे. कारणं पंचनामा हा घटनास्थळी जाऊनच करायचा आहे. समजा शेती पिक किती पाण्यात आहे. शेतीवर पूरातून किती गाळ माती वाळू आली आहे. कोणते पिक किती पाण्यात असल्यावर किती टक्के नुकसानभरपाई मिळते हे सर्वसामान्य माणसाला समजावून सांगणे गरजेचे आहे. घरासाठी सुध्दा असाच पंचनामा करायचा आहे घर काय परस्थिती आहे. साधे. कच्चे. कौलाचे. पत्र्याचे. घरात पाणी किती आलें आहे किती दिवस घरात पाणी होते. बांधकाम मातीचे आहे. कोणता कोपरा पडला आहे. घराला चिरा गेल्या आहेत का. हे सर्व जागयावरच कळणार आहे ग्रामपंचायत मध्ये बसून नाही. जनावरांचे लहान मोठे कोंबड्या. शेळ्या मेंढ्या रेडक म्हैस गाय मांजर कुत्रा व अन्य प्राणी ही जनावरे किती होती त्यातील गायब किती. मयत किती हे जागयावरच बघायला पाहिजे.घरात गाळ आहे. बाधित कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू पुरविणे. जनावरांना चारा उपलब्ध करून देणे एका जाग्यावर बसून नाही. आणि वरील सर्व पंचनामे घटनास्थळी झाल्यावर बाधित कुटुंबाची पंचनाम्यावर सहि घेऊन एक पंचनामा प्रत बाधित कुटुंबाला त्यांनी नाही मागितली तरी देणें बंधनकारक आहे
पंचनामा हा खरे सत्य. जागा निहाय प्रस्थिती बघण्याचे व दाखविण्याचे स्वच्छ पारदर्शक माध्यम आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील ज्या गावातील लोक पूरबाधित आहेत अशा लोकांनी आपल्या नुकसानीचे अर्ज कोणाच्याही हातात न देता संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना घटनास्थळी येण्याचा आग्रह धरा. अधिकारी व कर्मचारी आपल्या सेवेसाठी शासनाने नेमले आहेत. आपल्या गावात आपल्या शेजारी एखाद्या व्यक्तिच्या घराचा शेतीचा बोगस पंचनामा झाला असेल कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांनी केला असेल तर संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची मा जिल्हाधिकारी साहेब यांचेकडे तक्रार करा.
अहमद मुुंडेhttps://youtu.be/yB9ua3il8vs

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular