दाव्याला बांधून
गायीला आणली
दुधालाही झाली
कामालाही आली !
दुःखाचे रांजण
भरत राहिली
कष्टाचे डोंगर
खणत राहिली !
घरातील घाण
काढीत राहिली
मळ काढताना
केरसुणी झाली !
जिभेने मायेने
चाटीत राहिली
अरिष्ट येताच
हंबरु लागली !
गायीची वासरे
घरभर झाली
गोठ्यातच घास
मारून राहिली !
पतिव्रता नारी
तुला कोण वाली
परतीच्या वाटे
काटेरी बाभळी !
मुख्यसंपादक