Homeसंपादकीयपर्यावरण दिन स्पेशल : पर्यावरणाचे संवर्धन….

पर्यावरण दिन स्पेशल : पर्यावरणाचे संवर्धन….

५ जून पर्यावरण दिवस….

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा परिसर, असाच समज सर्वांचा आहे, परंतु आपल्या जीवनावर परिणाम करणारी भोवतालची परिस्थिती म्हणजेच पर्यावरण होय.

माणूस हा सक्षम प्राणी असला तरी त्याने आपल्या गरजेपुरतं मर्यादित न राहता, आपल्या पुढच्या अनेक पिढ्या आपल्यामुळे सुखी व्हावीत म्हणून करून ठेवलेल्या उपभोगाच्या गोष्टी, पर्यावरणावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परीणाम करत असतात.
आज पर्यावरणाचा पूर्णपणे ऱ्हास होत चाललेला आहे.

प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं तर शहरात सगळीकडेच आज इमारतींचंच जंगल दिसते, ह्याच इमारती बांधण्यासाठी वृक्षतोड केलेली असते. जेथे जंगल होती, तेथेही मानवाने ती जंगलं तोडून राहण्यासाठी घरे बांधली, याच जंगलातून रस्ते निर्माण केले गेले, सगळीकडे काँक्रीटीकरण आणि डांबरीकरण दिसते. जिकडे खरंच गरज आहे तिथे घरे आणि रस्त्यांचे काम झालेच पाहिजे यासाठी माझेही दुमत नाही.
पण झाडांची काळजी घेणे आणि त्यांचे संरक्षण करणे ही आपल्याच सर्वांची जबाबदारी आहे, हेही विसरून चालणार नाही.

आता जी काही शिल्लक राहिलेली जंगलं आहेत ती जपली गेली पाहिजेत, त्याच जंगलांची काळजी घेतली पाहिजे, तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.
लोकांच्या मनात पर्यावरण विषयी जण जागृती केली पाहिजे, लोकांनाही कळले पाहिजे की, आपणच आपले शत्रू होत चाललो आहोत.
प्रत्येकाने एक झाड जरी लावले तरी, उद्या होणाऱ्या मोठया नुकसाणीपासून आपण सगळेच वाचू शकतो. आजची परिस्थिती काय आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे, आज जी परिस्थिती आपल्यावर ओढवली आहे त्याला कोण जबाबदार आहे ? आपणच सगळे याला जबाबदार आहोत.
झाडे माणसानेच तोडली, मग ऑक्सिजनचा होणारा त्रास माणसालाच होणार ना !!

पर्यावरणाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि ती जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत केली पाहिजे.
सर्वप्रथम माणसाने झाडांची कत्तल थांबवली पाहिजे, आपल्या गरजे नुसार झाडं तोडणे बंद केले पाहिजे, तोडलेच तर तोडण्याआधी एक झाड जरूर लावावे.

वृक्ष लागवडीसारखे उपक्रम ठीक-ठिकाणी राबवले गेले पाहिजेत, आणि लागवड केलेल्या झाडांची योग्य ती काळजीही घेतले गेली पाहिजे, सगळीच झाडे जगतील याकडे जास्त लक्ष दिले गेले पाहिजे.
मुख्यत्वे शासनानेही याकडे लक्ष दिले पाहिजे, परंतु शासनाच्याच अंमलबजावणीवर अवलंबून न राहता लोकांनीही त्यात लक्ष घातले पाहिजे, गावपातळीवर तसेच शहरात देखील शक्य तेथे वृक्ष-लागवड झाली पाहिजे.

“पर्यावरण वाचवा – जीवन वाचवा”
हे घोषवाक्य तयार करून पर्यावरण वाचवण्याचे धडे लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत. आणि त्याची अंमलबजावणीही झाली पाहिजे.
या सर्व गोष्टी जर सर्वांनीच कटाक्षाने पाळल्या तर नक्कीच पर्यावरणाचा समतोल राखण्यास आपली मदत होऊ शकते.

 • विजय वैशाली दत्ताराम पराडकर
  ( आण्णा )
  विरार
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

5 COMMENTS

 1. नमस्कार
  प्रथमत: लिंक मराठी चॅनेलचे सह-संपादक “अमित गुरव” यांचे मी आभार मानतो.
  आपल्या माध्यमातून मला आपल्या चॅनेलला माझे लेख ,कविता, कथा प्रसारित करून “वाचकराजा” पर्यंत पोहचवण्यास मदत होते, यासाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद….!!💐

  ५ जून,
  पर्यावरण दिन चे औचित्य साधून आपण मला लेख लिहिण्यास प्रोत्साहन दिलात, आणि लेख आपण चॅनेल मार्फत प्रसारित केलात, म्हणूनच मी आपला आभारी आहे.

  धन्यवाद
  विजय वैशाली दत्ताराम पराडकर
  ( आण्णा )
  विरार

- Advertisment -spot_img

Most Popular