Homeघडामोडीपाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडीतील जवान शहीद

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडीतील जवान शहीद

आजरा:- ऐन दिवाळी तोंडावर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मू काश्मीर मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला या मध्ये बहिरेवाडी ता. आजरा जि. कोल्हापूर येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे (वय २०) हे जवान शहीद झाले.
ऋषिकेश यांची पहिलीच पोस्टिंग जम्मू येथे झाली होती. ११ जून २०२० रोजी सुट्टी संपवुन जम्मू येथे हजर झाले होते. २०१८ ला कोल्हापूर बी. आर.ओ. ६ मराठा मध्ये ते भरती झाले होते. त्यानंतर बेळगाव मध्ये ट्रेंनिग ९ महिन्याचे झाले होते.
त्यांच्या पाठीमागे आई- १लहान बहीण आहे. एकुलता एक मुलगा शहीद झाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular