Homeसंपादकीयपानवल्या डोळ्यांचा नवस आभाळाला

पानवल्या डोळ्यांचा नवस आभाळाला

वर निय आभाय
खाली कायी भुई
असवांचा पाऊस माझ्या
नाचे मोर थुईथुई
रीती नभशाला
पीळ काळजाला
पिंगा घालतो वारा
मलुल शिवारा
पानवल्या डोळ्यांचा
नवस आभाळाला
बाई पांभर नांदवली
वटी नवी ग बांधली
रिमझिम पान्या साठी
माझी पांभर थांबली
सालाची ग पेरणी
कोबं ह्रदयी अंकुरला
धन्याच्या ग डोळ्यातून
थेंब थेंब मिरूग बरसला

                  संतोष पाटील  
              
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular