‘मराठमोळा बैलपोळा’
आज माझ्या अंगणी
कसं बहरलं गोधनं….
सर्जा राजाच्या कष्टानं
सजलं शिवारं हिरव्या पिकानं….
आज बैलपोळा
सण हामराठमोळा….
आज त्यांना नटवा, मिरवा
झुल मखमली घाला…..
निवद पुरणपोळीचा माझ्या
सर्जा राजाला दावा…..
आज माझ्या पदरी भाकरं
तुझाच रं आशिर्वादं….
मी पोशिंदा साऱ्या जगाचा
पण त्यात तूझं कष्ट अपार…..
नका ओढू आसूड
आज सण मांगल्याचा….
बांधा डो़ई बाशिंग,बांधा गोंडे
चढवा झूल,मिरवूनी त्याला
करा गजर ढोल ताशांचा…
आज पुंजून त्याला
करूया औक्षण….
पुरण पोळी खाऊ घालून
पुजा करीन सुवासीन….
बळीराजाचा सखा तू
नाही कधी फिटणार तुझं ऋण….
महागाईचा डोंगर डोई,राजा घे मानूनी ,पोळा करतो साधेपणानं….
लेखिका-सौ.भाग्यश्री शिंदे(मोरे) आपेगांवकर,
ता.अंबेजोगाई,
जि.बीड
मुख्यसंपादक
[…] मराठमोळा बैलपोळा अमित गुरव […]