अहिल्यामातेला कोटी कोटी प्रणाम
त्यांच्या कार्याला माझा सलाम.
आली संकटे खुप मातेवर
डोळ्यादेखत पाहिले आप्तजनाचे मरण.
नाही डगमगल्या संकटाला
चांगलाच धड़ा शिकवला शत्रुला.
लोककल्याणकारी राज्य केले
आदर्श राज्याचे धड़े आम्हा दिले.
न्यायाने तुम्ही राज्य उभारिले
अन्यायाला दंडित केले.
गाईला चारा,मुंग्याना साखर, माशाला भाकर
माता भारी भरली तू जगावर.
मातेची साधी राहणी, उच्च विचारसरणी
अनुकरण करेल का ? आजचा राजकारणी.
आदर्श राज्य तुझे लोककल्याणकारी
कार्य तुझे कश्मीर ते कन्याकुमारी.
तुझ्या कार्याने प्रभावित जनता
गौरविले तुज राजमाता,राष्ट्रमाता.
राज्य तुझे सुंदर स्वर्गाहुनी
गौरविले तुज पुण्यश्लोक देवी म्हणूनी.
तुझ्या कार्याला नाही विसरणार
आचार,विचार,कर्तुत्वाचा प्रसार करणार.
कवी - किसन आटोळे सर
वाहिरा, ता-आष्टी,जि-बीड़
मुख्यसंपादक