पक्ष्यांची किलबिल,
झाडांची सळसळ,
वाहतो गार वारा,
पहाट झाली,
ऊठा जन हो,
सांगतो शुक्रतारा…॥धृ॥
सुर्याने प्रकाशकिरण उधळले,
चमकला पृथ्वीचा कणकण सारा,
सर्वीकडे नवचैतन्य पसरले,
आवारा रात्रीचा पसारा….॥१॥
वेग येई कामाला,
प्रसन्न वाटे मनाला,
बागेतील फूले बघुनी,
फेर फटका मी मारीला…..॥२॥
© सौ.अंजली माधव देशपांडे.
नाशिक.
समन्वयक – पालघर जिल्हा