Homeमुक्त- व्यासपीठशेतकरी बंधुंनो शेती करणाऱ्या मुलाशीच आपल्या मुलीचे लग्न करा, कारण आपला मुलगाही...

शेतकरी बंधुंनो शेती करणाऱ्या मुलाशीच आपल्या मुलीचे लग्न करा, कारण आपला मुलगाही शेती करतो आहे हे विसरू नका

तमाम शेतकरी बंधूंनो माझी कळकळीची नम्र विनंती समजून घ्या आणि जर काही चुकत असेल तर मला माफ करा

तुळशी विवाह झाला की आपल्या भारतीय संस्कृती मध्ये लग्नसराई खर्‍या अर्थाने सुरू होते. घरातील कर्ता पुरुष काका, बाबा, मामा, वधू-वर शोधण्यासाठी फिरत असतात किंवा चर्चा करत असतात, समोरून आलेला निरोप, आमंत्रण ,बायोडाटा, याचा नीट विचार केला जातो आणि मग त्यावर चर्चा करून पुढील नियोजनाला सुरुवात होते. मात्र आपल्या घरामध्ये जर मुलीचे लग्न असेल तर आधी तो नोकरीला आहे का? काय करतो त्याचा पगार किती आहे याचा विचार केला जातो, म्हणजे नोकरी असणारा माणूस माझ्या मुलीला सुखी ठेवू शकेल ही मूर्खपणाची संकल्पना तमाम शेतकरी माय बापा मध्ये रुजू झालेली असल्यानं हा सगळा बट्ट्याबोळ झाला आहे, एक एकर गेलं तरी चालेल मात्र माझ्या मुलीला मी नोकरीवाला मुलगा शोधीन असा बापाचा अट्टाहास असतो ,असा अट्टाहास असणं काहीच गैर नाही कारण हाताच्या फोडा प्रमाण वाढवलेले लेकरू सुखी असावा इतकीच बापाची माफक अपेक्षा असते ,म्हणून तो हा सगळा आटापिटा करत असतो. माझा शेतकरी बाप एक गोष्ट विसरलेला आहे ती म्हणजे आपला मुलगा शेती करतो आपल्या मुलाला कुणी मुलगी दिली पाहिजे हा विचार तो पूर्णपणे विसरून गेलेला असतो. ज्याप्रमाणे आपल्याला वाटतं की आपली मुलगी ती नोकरी वाल्या च्या घरात सुखी संसारात गेली पाहिजे, तशी दुसऱ्याची मुलगी आपल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये कुणी कसं देईल याचा विचार आपण केला पाहिजे, आपली मुलगी नोकरी वाल्या च्या घरात आपल्या शेतकरी मुलाला मुलगी शोधताना गरीबाची असली तरी चालेल असे म्हणणारे पालक मी बहुतांश ठिकाणी पाहिले आहेत. ही विचारसरणी आपण बदलली पाहिजे अन्यथा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाची कधीच लग्न होणार नाही हे विसरू नका. एका बाजूला कोट्यावधी रुपयांचा सात-बारा आणि दुसऱ्या बाजूला वीस हजार रुपये महिन्याची पगार स्लिप ,तरी आपण पगार वाल्याचाच विचार करतो याहून दुसरे दुर्दैव काय असेल. दीनदुबळ्या गरीब शेतकरी शेतमजूर या सर्वांना वाटते की आपल्या मुलाचं लग्न व्हाव, त्या आईला वाटतं आपल्या मांडीवर आपला नातू खेळावा मात्र मुलांची पस्तीस चाळीस वर्षे वय होऊनही लग्न जमत नाहीत, चिंतातुर झाले माय-बाप हातामध्ये बायोडाटा घेऊन गावोगावी फिरत असतात आशी अवस्था समाजाची झालेली आहे त्याला कारण जर कुठला असेल तर पालकांची बदललेली मानसिकता हीच होय, बऱ्याच ठिकाणी समाजाचे वधु वर परिचय मेळावे घेतले जातात मात्र त्याठिकाणी एक चित्र स्पष्ट दिसतं नोकरीवाला, व्यापारी ,डॉक्टर, इंजिनिअर ,यांचाच विचार केला जातो, शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाचा विचार मुळीच केला जात नाही. शेतकऱ्यांची शेती करणारी पोरं वैफल्यग्रस्त होतात कधी कधी व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःला संपवून घेतात, लग्न ही माणसाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाची पायरी आहे याबद्दल नवीन सांगायची गरज नाही, मात्र तेच होत नसेल तर जीवन जगण्याला काही अर्थ नाही असं वाटून ही पोरं वेगळ्या मार्गाला लागलेली आहेत, शेतकरी असणे किंवा शेती करणे हे पाप नाही किंवा कुठला शाप ही नाही, जगाचा पोट भरण्याचा सन्मानीय असा व्यवसाय आहे अस्मानी सुलतानी च्या फेऱ्यांमध्ये सापडलेला शेतकरी आता मुलांची लग्न जमत नाहीत म्हणून प्रचंड कोंडी मध्ये सापडले आहे, मात्र या सगळ्या गोष्टींना कारण जर असेल तर आपणच आहोत फक्त आपण , समाजामध्ये मुलींचे प्रमाण कमी झाले आहे हे मी मान्य करतो मात्र ज्या मुली आहेत त्या मुलींचा व पालकांचा कल व्यवसायिक, सर्विस मॅन, यांच्याकडे असल्याने हा सगळा समतोल ढासळलेला आहे म्हणून सर्व शेतकरी बंधूंना गोरगरिबांना मी नम्र विनंती करतो की मित्र हो जर आपल्या घरामध्ये मुलगी असेल तर, आपली जशी परिस्थिती आहे तशाच मुलाला मुलगी द्या जर आपला मुलगा शेती करत असेल शेतकऱ्याची मुलगी सून म्हणून हवी असेल तर, आपण जावई ही शेतकरीच शोधा व सन्मानानं शेतकऱ्याच्या मुलीचं शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करा, व सर्वजण आनंदाने जगा….

http://linkmarathi.com/ओठ-फुटलेत-उपाय-काय/
                      संतोष पाटील 
                   
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular