Homeकृषीफडनवीसांनी फसवलं ठाकरेंनी ठगवलं दहा हजाराच्या बोयन वर शेतकर्‍याचं भागवलं .……

फडनवीसांनी फसवलं ठाकरेंनी ठगवलं दहा हजाराच्या बोयन वर शेतकर्‍याचं भागवलं .……

शेतकरी मित्रहो गेल्या महिन्यामध्ये अतिवृष्टी होऊन शेतीच व शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, आधीच कर्जबाजारी शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला ,शेतीसाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी महाग झाल्याने शेती शंभर टक्के तोट्यात जाणारा व्यवसाय ठरला, तरीही आपण समाजाचं देणं लागतो आपण कष्ट करणाऱ्याच्या घरात जन्म घेतला आहे म्हणून शेतकरी शेती करतो. हा बिन भरवशाचा व्यवसाय करताना शेतकऱ्याला आस्मानी सुलतानी व इतर बरेच काही संकटांना तोंड द्यावे लागतं. शेती हाच देशाचा कणा आहे शेतकरी हाच या देशाचा खरा सुपुत्र आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र आज शेती आणि शेतकऱ्याची झालेली अवस्था उघड्या डोळ्यांनी पाहावत नाही आणि डोळे मिटवल्याही जात नाही हे सगळं पहात असताना शांत ही बसता येत नाही. शेती पुढील आव्हाने आता आपले रूप बदलू लागले आहेत नुसते अस्मानी आणि सुलतानी संकटच शेतीवर नाहीत तर त्यामध्ये समाजाची मानसिकताही कारणीभूत झाली आहे. सुशिक्षित शिकलेल्या समाजातील लोकांना शेतकरी हा वेळपट मूर्ख (अजून बरंच काही) वाटतो. शेतकऱ्याला कष्टाचा दाम मिळत नाहीच पण त्याला सन्मान ही मिळत नाही त्याचा आत्मसन्मान वेळोवेळी दुखावला जातो. आपला हलाखीच्या संसार सांभाळत असताना कितीतरी अग्निदिव्यातून त्याला जावं लागतं त्याच्या मुलांचे लग्न होत नाही. म्हणजे शेतकरी असणे हे पाप आहे का असा सवाल मनात आल्याशिवाय राहात नाही. मी यापूर्वी बऱ्याच ठिकाणी लिहिलेला आहे की शेती हे भारलेला रिंगण आहे या रिंगणाच्या बाहेर शेतकऱ्या जाता येत नाही, त्याच्या जगण्याच्या जीवनाच्या सुखाच्या कक्षा कधीच वृंदावत नाहीत, एका सीमित कक्षेत आपले जीवन व्यतीत करणं त्याला भाग पडतं. साधा पान टपरीवाला व्यवसायिक ही आपलं जीवन आनंदाने जगत असतो भूमीहिन असला तरी त्याच्या मुलाबाळांचे लग्न पार पडतात. मात्र येथे लाखो ची शेती असूनही शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाही याला काय म्हणावे, छोटे छोटे व्यवसाय करून आपले जीवन आनंदाने जगणारी किती तरी कुटुंब आपण पाहतो, मात्र दहा वीस एकर शेती बागायती गडीमाणसं खळे मळे असणारे मोठे खटले कर्जबाजारी होऊन विकलांग झालेले दिसतात. या सर्व गोष्टींचे मूळ कारण म्हणजे तोट्यात गेलेली शेती होय.आधीच्या भाजप सरकारने महापुरुषांची नावे देऊन खोटी कर्जमाफी केलेली, कर्जमाफी च्या नावाखाली राज्य लुबाडूण घेतलं, त्याच्यानंतर आघाडीचं सरकार आलं वाटलं की आपलं सरकार आलंय पण नाही हे सरकार महाठक निघालं दुसऱ्या महापुरुषाचे नाव देऊन दुसरी कर्जमाफी फसवली आणि संपूर्ण महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाला, हे मान्य करतो की कोरोना नावाच्या महामारी मुळे सार विस्कळीत झालं पण कोरोनाच कवच-कुंडल करून या सरकारने स्वतःच्याच बचाव केला, कुठल्याच शेतकऱ्यांविषयी गरिबा विषयाच्या कल्याणकारी योजना त्यांनी अमलात आल्या नाहीत, दुसरी गोष्ट हे आघाडीचं सरकार आपल वाटत नाही , भाजपाचे लोक लबाड होते ,हे लोक चोर आहे त्याच्या पलीकडे दुसरं काय म्हणावं ,खरं म्हणजे निवडणुकीच्या अजेंडा मधून शेतकरी गायब झाला त्याच दिवशी शेतकरी संपला.

http://linkmarathi.com/सप्तशृंगी-गड-वणी/
http://linkmarathi.com/तिचं-sorry-आणि-hi/
               संतोष पाटील 
            7666447112
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular