ना कुणाचा सहवास
ना कुणाचा इथे प्रवास
सकल जग भासे भकास
मी भोगतोय इथे बंदिस्त कारावास
आमच्याच अंतरंगात आम्ही
शोधत असतो आमचेच मन
दैनंदिनी आम्हा स्वकीयांच्या
मार्गाकडे रोखून असतो नयन
काय सांगावी,
कुणाला आमची व्यथा
जरी लिहिली तरी
कोण वाचणार आहे आमची कथा
हौस होती म्हणून इथे नाही आलो
अत्याचाराच्या कचाट्यात सापडलो गेलो
विश्वासघातकी नजरेला बळी पडलो
आणि जन्मठेपेच्या शिक्षेला पात्र झालो
केला जरी गुन्हा
तरी काळीज मात्र लेकरांसाठी तुटतो
आईच्या आणि बायकोच्या डोळ्यांत
आम्ही आमच्याच सुटकेची आशा बघतो
आज माझ्या अश्रूंनीच मी न्हालो
स्वतःच्याच अंतरंगात पुन्हा एकदा बुडालो
बंदिस्त असलो म्हणून गप्प नाही बसलो
कुणाच्यातरी लेखणीचा भाग बनून गेलो….
- विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )

मुख्यसंपादक
माझ्या शब्दांचे आपण मोल केलंत ……
लिंक मराठी आणि चॅनेल चे सह-संपादक अमित गुरव यांचे, मनःपूर्वक धन्यवाद…..
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )
Khup chan
आपले मनःपूर्वक धन्यवाद….!!💐
Khup mast
अप्रतिम शब्दरचना, सुंदर…..
काव्य लेखन ही एक कला आहे आणि आपण त्याची जोपासना कराल ही अपेक्षा…….
प्रथमतः आपले मनःपूर्वक धन्यवाद…..!!💐
आपण म्हटल्याप्रमाणे लेखन ही एक एक अप्रतिम कला आहे, आणि त्याची जोपासना मी अखंड करेन, आपली अशीच एक शाबासकीची थाप कायम माझ्या पाठीवर असुद्या हीच सदिच्छा……..!!
धन्यवाद…….!!💐
आपले मनःपूर्वक धन्यवाद……..!!💐
नमस्कार – माझ्या कवितेला आपण दाद देऊन एक सहबसकीची थाप पाठीवर ठेवलीत, त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद…!!💐
खूप सुंदर शब्दरचना
आपले मनःपूर्वक धन्यवाद …….!!
आपल्या याच शाबासकीच्या शब्द-सुमनांमुळे लिहिण्याची उमेद द्विगुणित होते……असाच स्नेह माझ्या शब्दांवरती कायम असुद्या……
धन्यवाद…….!!💐
खूप सुंदर शब्दरचना , आण्णा
आपले मनःपूर्वक धन्यवाद…..!!💐
apratim..
mast..