बाप…

बाप कष्टाची भाकर
बाप आयुष्याचा दोर
त्याचा पाय निखाऱ्यावर
तरी सांभाळी परिवार

बाप करी वणवण
त्याला नसे कशाचं भान
झिजलंया शरीर तरी
करी शिदोरी साठवण

रानी वनी फिरताना
बाप घेतो खांद्यावर
गर्द हिरवळी संगे
होते जगाची सफर

बाप पहाडासारखा
माझा दैव पाठीराखा
बाप गंध चांदनाचा
बाप रंग जीवनाचा

✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर- आण्णा
( विरार )

*माझी लेखणी साहित्य मंच आयोजित “बाप” काव्यवाचन स्पर्धा**स्पर्धक : कवी विजय वैशाली दत्ताराम पराडकर, विरार**मला या स्पर्धेत विजेते करण्यासाठी माझ्या व्हिडिओला like, Comment, Share करा आणि चॅनलला Subscribe करायला विसरू नका.**धन्यवाद !*

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular