Homeबिझनेसआज दिवसभरातल्या बिझनेस News | 21 एप्रिल 2022

आज दिवसभरातल्या बिझनेस News | 21 एप्रिल 2022

📌 शेअरच्या किंमतवाढीचे सुखद धक्के देणारा पॉलीकॅब इंडिया लिमिटेड.
पॉलीकॅब इंडियाचा स्टॉक गुरुवारी एकूणच भांडवली बाजाराच्या तेजीला साथ देत आहे.
सत्राच्या सुरुवातीच्या काही तासांतच तो ५% ने वाढला आहे.
तांत्रिक आलेख पाहता या शेअरने खुला=किमान स्थितीसह एक तेजीची कँडल तयार केली आहे.

📌 या सरकारी कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांची संपत्ती केली वर्षभरात दुप्पट.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड ही एस अँड पी बीएसई ५०० गटातील एक आघाडीची कंपनी आहे.
तिचे मुख्यालय हैदराबाद येथे असून ती एक भारतीय संरक्षण कंपनी आहे.
कंपनी दारूगोळा आणि क्षेपणास्त्र निर्मिती व्यवसायात कार्यरत आहे.

📌 सहारा समूहाचे घोटाळे; सुब्रतो रॉय यांच्या अटकेसाठी मध्य प्रदेश पोलीस लखनऊत दाखल.
सहारा समूहातील आर्थिक घोटाळ्यात सामान्य गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
या योजनांसाठी काम करणाऱ्या एजंट्सना गुंतवणूकदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
रॉय दाम्पत्य आणि संचालकांविरोधात मध्य प्रदेशातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular