एका शिफ्ट मध्ये नाही तर दोन दोन
शिप्ट काम करु.
पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसाच्याण
नाही भागल तर रात्री ही मेहनत करु
पण आमच्या भविष्याचा मेंदू उपाशी नाही रहायला पाहिजे.
तोंड पाठ पाढे गणीताचे भुमितीचे
अवघड सुत्र, फाड फाड इंग्रजी
एकुण कौतुक
वाटायच हो लेकराच..
मग हा कोरोना आला आणि तुम्ही शाळा बंद केल्या
महीना दोन महिने नाही तर वर्ष दोन वर्ष लाॅकडाउण लावल.
अन् पुन्हा आणू घातलाय नवा डेल्टा कि ओमिकरान कोरोना अन् पुन्हा निमित्तच
तुम्हाला शाळा बंद करायला नवं …
आमचे व्यवसाय बंद केले
आमचा रोजगार हिणवला
नौकर्या घालवल्या
आमचा शेतमाल कवडी मोल विकला
काही धुर्यावर फेकून दिला
तरीही आम्ही मेलो नाही
पण मात्र तुम्ही शाळा बंद करून
आमचं भविष्य मारताय
तुम्ही मंदीर बंद केली
बजार बंद केला
आमची दुकान बंद केली
आमच काही म्हणणं नाही
अन् मदीरालय मात्र सताड उघडी
पोलिस संरक्षणात ….
ज्ञान मंदीरे मात्र तुम्ही बंद केली
तव्हा मात्र डोक्याची नस फणफण करु लागली
खरंय हो साहेब तुमच बी
आम्हा सर्व सामान्यांची लेकरं शिकली तर
तुमच्या भविष्याच काय?
कोण उचलवीन तुमच्या सतरंज्या,
कपबशा, कोण मिरवीण तुमचे झेंडे दांडे
कोरोना च्या आडून तुम्ही तुमच्या युवा नेत्याच्या भविष्याची सोय करताय.
आमच्या भविष्याची माती होते आहे त्याच काय….
आमच्या भविष्याची माती होतेय त्याच काय ?
जगन्नाथ काकडे
मेसखेडकर
मुख्यसंपादक