( यशाचे गमक कम्युनिकेशन )
[कोणत्याही संस्थेचे यश हे तिच्यामध्ये काम करणाऱ्या माणसांवर अवलंबून असते. सर्वाना बरोबर घेऊन काम केले पाहिजे. योग्य कम्युनिकेशन हा मंत्र सर्वानीच पाळला पाहिजे.]
सर्वसाधारण प्रत्येक संस्थेत प्रथेनुसार एक बॉस असतो, त्याने प्रत्येकाला जबाबदारी दिलेली/सोपविलेली असते. या जबाबदारांचे कुंपण आखून दिलेले असते आणि या बॉसचे म्हणणे असते की, मी इतरांपेक्षा शहाणा (?) अनुभवी (??) आहे म्हणून मलाच बॉस केले आहे. आपण सर्वांनी मी सांगतल्याप्रमाणे आपले काम चोख करावयाचे आहे. प्रत्येकाला जबाबदारीची बाउंड्री आखलेली असते. ज्या ज्या वेळी बॉस मिटिंग घेतो त्या त्या वेळी एक गंभीर वातावरण तयार करण्यात येते किंवा असे गंभीर वातावरण व्हावे अशीच योजना केलेली असते. (अर्थात त्या बॉसनेच) आणि अशा मिटींगमध्ये बॉस मिटींगमध्ये माहिती देणे, माहिती सांगणे, सूचना देणे व कामाला लावतो. म्हणजे अशा मिटींगमध्ये माहिती देणे, माहिती सांगणे, सूचना देणे एवढाच अजेंडा असतो. असे निर्णय सर्वांशी विचारविनिमय करून घेण्यासाठी, अशी मिटिंग हा बॉस घेत नाही तर just to communicate the information. अशा वेळी अन्य बॉस-अन्य विभागाचे बॉस अशा निर्णयावर खुश नसतात. उलट या बॉसला कम्यूनिकेटीव्ह डिसिजन कसा पालथा पडायचा, याचे ते प्लाॅंनिग करायला लागतात. प्रत्येक डिपार्टमेंट हे इंटरलीक्ड असतेच.
या बॉसचा जो बिग बॉस असतो त्याच्याशी वेगवेगळे बॉसेस स्वतंत्रपणे संधान साधतात आणि आपल्या विभागासाठी आपल्याला पाहिजे तसा डिसिजन बिगबॉसकडून घेतात. म्हणजे उदारणार्थ माझ्या हाताखालच्या असि.मॅनेजरला काहीतरी सांगून दुसऱ्याकडे बदलायचा आणि आपल्याला हवा तसा मॅनेजर अपाॅइंट करून घ्यायचा. काही गोष्टी असे बॉस आपल्याकडे राखीव माहिती म्हणून ठेवतात आणि बिगबॉसचे कान भरतात, मत कलुषित करतात, संभ्रम निर्माण करतात आणि ते केवळ आपल्या स्वार्थासाठी ग्रुपच्या किंवा संस्थेच्या भल्यासाठी नव्हे. असे बॉसच्या काड्या लावण्यात एकदम पटाईत ! यांचे हे कम्युनिकेशन हे त्यांच्या यशाचे गमक असते. कारण त्या त्या हाताखालच्या लोकांना, त्याला खुश ठेवायचे एवढेच माहिती असते, कारण हा आपला बॉस बिग बॉसच्या कानाला लागणारा आहे. हे सर्वाना ज्ञात असते. अशावेळी बऱ्याच वेळा संस्थेचे नुकसान होते. निर्णयाची अंमलबजावणी करताना आलेल्या अडचणी किंवा सुधारणा सांगण्यास कोणीच तयार होत नाही. उगाच कशाला वाईटपणा घ्या? किंवा बोलून काय फायदा काय उपयोग आहे का? काय बदल होणार आहे का? हे सर्वानी गृहीतच धरलेले असते.
सर्वसाधारणत ज्या संस्थेमध्ये अतिशय कडक बंधने व नियमावली यांची चढती भाजणी असते अशा संस्थामध्ये बिग बॉस बोले ते दल हाले अशी स्थिती असते. अजूनही अनेक संस्थामध्ये हीच पारंपारिक पद्धती चालू आहे. यामुळे निर्णयाची अंमलबजावणी नीट होत नाही. जाणीवपूर्वक कोठेतरी टाळाटाळ करण्यात येते. खालच्या सैनिकांमध्ये असंतोष व द्वेष धुमसत राहतो. कारण शेवटी प्रत्येकाला मला विचारत नाहीत, हि बोचणी/टोचणी फार क्लेशदायक असते.
मात्र या उलट, सध्याचा माॅडर्न युगात जेथे ह्युमन रिसोर्सला कॅपिटल मानण्यात येते. सेवक वर्गाला लायबिलिटी न समजता, संस्थेच्या अॅसेट्समध्ये गणना केली जाते. तिथे वरील प्रकार आता कमी होऊ लागलेत. किंबहुना नवीन, आधुनिक बिझनेस मॅनेजमेंटमध्ये तसेच शिकविले जाऊ लागले आहे. कारण संस्थेत कुंपण घालून, जबाबदारी टाकून आपण मोकळे राहणे घातक आहे हे सिद्ध झाले आहे. आपल्या संस्थेत काम करणारा माणूस नको आहे. तर एकत्रितपणे काम करून उद्धिष्ट साध्य करणारी माणसे हवी आहेत. A good Boss always tries to build working groups सर्वाना एकत्रित घेऊन, निर्णयावर येण्यापूर्वी चर्चा, शंका-अडचणी, सूचना यांचा विचार करून डिसिजन घेतला जातो. त्यामुळे बॉस बोले आणि दल हाले असे होत नाही. ग्रुपचा निर्णय असल्याने, त्यावर काड्या घालण्याचे काम यशस्वी होऊ शकत नाही. कारण हा घेतलेला सर्वांचा निर्णय असतो. तो लादलेला किंवा वरून टाकलेला नसतो. यात जास्तीत जास्त सर्वांचा आणि पर्यायने आपल्या विभागाचे त्यातून इतर विभागांचे आणि शेवटी संस्थेचे भले होणार आहे ना, हे पहिले जाते. अशा ग्रुप डिसिजनमध्ये कोण लाडका-कोण दोडका, कोण कामाला लागतो याचा विचार केला जात नाही आणि किणी असे करण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होत नाही. बर्याच वेळा संस्थेतील जुनी माणसे असतात. बदलायला तयार होत नाहीत. मात्र अशांमुळे संस्थेची वाढ खुंटते, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत
मुख्यसंपादक