Homeकृषीभादवण गावात खताचा घोटाळा -कृषी विभागाची कारवाई

भादवण गावात खताचा घोटाळा -कृषी विभागाची कारवाई

आजरा -( प्रतिनिधी ) : भादवण गावात युरिया ची विक्री अधिक किंमती मद्ये करून घोटाळा झाल्याचे समजते. शेती सेवा च्या नावाने दुकानदार साठा करून ठेवतात. आणि शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी जास्त भावाने विक्री केली जाते असा प्रकार तालुका कृषी अधिकारी मोमीन यांच्या पथकाने उघडकीस १८ मार्च २०२१ रोजी आणला. टॉप २० शेतकऱ्यांची यादी तपासली असता ती बोगस असल्याचे त्यांना निदर्शनास आले. त्यातील काही ग्रामस्थ व्यावसायिक तर काही मुंबई येथे काम करतात.

यापूर्वी ही असे प्रकार ह्याच सेवा केंद्रात झाले आहेत .पण वरिष्ठांना अंधारात ठेवून काहींनी त्यांना वाचवल्याची चर्चा होती पण आता त्यांचे दुकान बंद करण्यात येणार का की असेच व्यवहार होत राहणार याकडे भादवण पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लक्ष केंद्रित केले आहे.

(काही तांत्रिक अडचणी दूर करत बातमीची संबधित लिंक पुन्हा update करत आहोत. )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular