Homeमुक्त- व्यासपीठभावकी-कुणाला न सुटलेला प्रश्न

भावकी-कुणाला न सुटलेला प्रश्न

चुकणे हा मनुष्य धर्म आहे. प्रत्येक माणसाच्या हातून जिवनात काही ना काही चुका नकळत घडत असतात .काही गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात. एकाच गोष्टीला धरून त्याच प्रदर्शन करायचं नसतं..भावकी-भावकीतील भांडण हा आजतागायत कुणालाही न सुटलेला प्रश्न आहे.
भावकीतील भांडण हे आपलं क्षेत्र नसावे..भावकीतील माणसं हे एकमेकांचे स्पर्धक नसून प्रत्येकजण स्वताला सिध्द करण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकत असतो यांचा अर्थ ते एकमेकांशी स्पर्धा करतात असा मुळीच घ्यायचा नसतो तर कालच्या पेक्षा आजचा, उद्याच दिवस कसा उज्ज्वल बनेल यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो…भावकीतील भांडणांमुळे मुलांच्या शिक्षणावर, वृध्द व्यक्तीच्या आरोग्यावर दिर्घकालीन फार गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत असते …. भावकीतील भांडणांमुळे माणुस अधोगतीकडे मार्गक्रमण करतो.. या नादात मुलांचे फ्युचर प्लॅन तयार करणे त्याला कधी सुचतच नाही आणि बघता बघता आयुष्य संपून जाते… शेवटी पश्चातापाशिवाय काही उरत नाही…
जिवन खुप सुंदर आणि खूप लहान आहे. एकमेकांनाबद्दल नेहमी सहकार्याची भावना मनामध्ये ठेवून आपण व्यक्तीगत पैशाने, माणुसकीने कसे मजबूत बनता येईल याकडे विशेषतः लक्ष दिले तर आपल्याला कोणीही हरवू शकत नाही..

लेखक – रमेश पवार

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

2 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular