Homeमुक्त- व्यासपीठएक होता लेखक….२

एक होता लेखक….२

भाग २.

१९९८ ला तो पुण्यात आला तेंव्हा त्याच्या खिशात होते निव्वळ ३५० रु.
लेहेंगा, झब्बा,दाढी वाढलेली,खिशाला पेन, खांद्यावर शबनम,आणि उरात मोठा लेखक व्हायची स्वप्न घेऊन एसटीतुन तो स्वारगेटला उतरला तेंव्हा ….
या अनोळख्या शहरात त्याचं कोणी कोणी नव्हतं.
पुणं म्हणजे साहित्याचं माहेरघर आहे हे ऐकलं होतं त्यानं.
पण याच साहित्यिक शहराचं आपण पुढे हृदय होणार आहोत ही गोष्ट त्याच्या कल्पनेतही नव्हती.
तो इथं यायच्या आगोदर मागे बऱ्याच गोष्टी सुटल्या होत्या.
त्याचं घर,त्याची माणसं,त्याचे आई-वडील तर काळाने हिरावून नेले होते.
अनाथ होता आता तो या जगाच्या पसाऱ्यात.
ग्रेस म्हणाले होते एका कवितेत.
मला या भाषेत अनाथ वाटतंय.
तसंच काहीसं त्याचं झालेलं.

रायटर का कोई ठिकाणा नहीं होता..…..
ना ही रायटर किसिका होता है.
वो तो तनहा जीवन में….
यादोंके लब्ज बुनता है.

कलाकाराला अपूर्णतेचा शाप असतो म्हणतात.
पण या अपूर्णतेत सगळ्या जगाला सामावून घ्यायची ताकद ठेवतो कलाकार.
पण शेवटपर्यंत त्याला समजून कोणी घेत नाही.
हेच दुःख आयुष्यभर सलत राहतं कलाकाराला.
आई वडील गेले…..
संपल सगळ.
आता फक्त या कवितांचा आधार.
तेच आता जगण्याचं साधन.
त्याचे डोळे भरले.
रिते होत राहिली मनातली पांढरीशुभ्र गंगा.
अति दुःख झालं की रडून घ्यावं माणसानं.
फार मोकळं होतं मनात दाटलेलं आभाळ.
बस आली….
शर्टाच्या बाहीने त्याने डोळे पुसले.
एसटी त चढला.
खिडकी शेजारची जागा पकडून बाहेरचं अस्ताव्यस्त पसरलेलं पुणं पाहत राहिला.
जग फार मोठंय.
आपलं मन ही तितकंच मोठं व्हायला हवं.
उद्या मी असेन नसेन पण माझी ओळख कायम राहिली पाहिजे.
माझं साहित्य हे लोकांच्या काळजात अजरामर झालं पाहिजे.
तो विचार करू लागला होता इतक्यात कंडक्टर जवळ आला.
कुठे जायचंय.?
दगडूशेठ हलवाई गणपती.
त्याने थंडपणे उत्तर दिलं.
तिकीट फाडून त्याच्या हातात देत कंडक्टरने पैसे आपल्या पर्स मध्ये टाकले.
एव्हाना गाडी सुटली होती.
आता फक्त आठवणींचा प्रवास…….
आठवणीत जगायची फार हौस असते माणसाला.
जोपर्यंत आठवणी आहेत तोपर्यंत जीवन आहे.
आठवणी संपल्या …..जगणं संपलं.
कोल्हापुरात आपलं आता काहीच उरलं नाही.
उरल्या त्या फक्त आठवणी.
या आठवणीचं मला आता पुण्यात जगायला शिकवतील.
सोबत राहतील.
कलाकाराचं दुःख मोठं .पण त्याला वेदनेचं अत्तर लावून जगत असतो कलाकार.
त्याला समजून कोण घेणार.?
सालं हे आयुष्य म्हणजे एक जुगारच आहे.
आपण जीवन्त असतो तेंव्हा श्वासांच्या मात्रा मोजत जगत असतो.
आणि मेलो की समाज आपले दिवस मोजत असतो.
तरीही वाटतं आपल्याला की आपण फार कमावलंय.
हट्ट साला…..
जिंदगी से तब तक लड़ते रहो जब तुम हार ना जावो.
असे किती विचार ,त्याला आतून उसवणार होते कुणास ठाऊक पण एका वाक्याने त्याची तंद्री भंगली.
चला दगडूशेठ हलवाई गणपती उतरणारे पटापट उतरा.
कंडक्टर सांगत होता.
तो आपली शबनम सावरत खाली उतरला तेंव्हा तो देवळाच्या दारात उभा होता.
देव………
आयुष्याचे सगळे मार्ग बंद झाले की माणसाला शहाणपणाने सुचलेला आधार म्हणजे देव.
याच आधाराच्या कुबड्या घेऊन आयुष्यभर जगत राहतो माणूस.
घंटी वाजवत त्याने मंदिरात प्रवेश केला.
दगडूशेठ गणपतीची सुबक आणि प्रसन्न मूर्ती पाहून त्याने हात जोडले.
देवा गजानना……
पर मुलखातलं एक पाखरू तुझ्या छायेत आलंय.
त्याला तुझ्या पंखाखाली घे….
मायेची ऊब दे.
त्याला जीव लाव.
त्याचा आधार बन.
त्याने मनोमन प्रार्थना केली.
काही निरागस प्रार्थना देवापर्यंत पोहोचतातच.
कारण त्यावेळी आपलं मन पवित्र झालेलं असतं.
त्याने हाळूच डोळे उघडले.
आता प्रसन्न वाटत होतं त्याला.

गणाधिश जो ईश सर्वांगुणाचा….
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा.
नमो शारदा मूळ तत्वार वाचा.
गमू पंथ अनंत त्या राघवाचा.
जय जय रघुवीर समर्थ.

त्याने असं म्हणताच दगडूशेठच्या डोक्यावरचं एक फुल खाली पडलं.
हा शुभ शकुन तरी नाही ना….?
काय माहीत..
मनोभावे देवाला नमस्कार करून तो बाहेर पडला.
एव्हाना रस्त्यावरची वर्दळ वाढत चालली होती.
आता या गर्दीचा आपणही एक भाग व्हायला हवं.
तो गर्दीत शिरला.
गर्दीतला दर्दी रसिक शोधायला.
आता बाहेरची गर्दी वाढतच चालली होती.
संथ गतीनं.
मनातली गर्दी कमी करत.

✍🏻 दत्तात्रयश्रीकांत गुरव

कोल्हापूर.

क्रमशः …….

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular