Homeमाझा अधिकारमतदानाची गरज होती

मतदानाची गरज होती

आज गावात सगळीकडे रोषनाई होती
दारोदारी माणसाची गर्दी होती
गरीबांच्या घरी पुरणाची पोळी होती
लहानग्यांच्या हातात खाऊची पिशवी होती

तेव्हा समजले आज यांना आपल्या मतदानाची गरज होती

पाच वर्षांपूर्वी उगवलेले आज पुन्हा उगवले होते,
समस्या घेऊन गेल्यावर दुर्लक्ष करणारे आज हात जोडून दरवाजात उभे होते

तेव्हा समजले आज यांना आपल्या मतदानाची गरज होती

गाडीशिवाय न फिरणारे नेते आज
दारोदारी जाऊन लोक विकत घेऊ पाहात होते,
कोणाला लालच देऊन तर कुणाला धमकी देऊन मत विकत घेत होते

तेव्हा समजले आज यांना आपल्या मतदानाची गरज होती

आज सगळ्यांचे मोर्चे ओसाड त्या पाड्याकडे वळले होते
मोठमोठय़ा घोषवाक्यांनी रस्ते दणाणून सोडले हाेते,
खोटी आश्वासने देऊन स्वार्थ साधू पाहत होते,

तेव्हा समजले आज यांना आपल्या मतदानाची गरज होती

कवयित्री- नेहा नितीन संखे
( बोईसर )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular