HomeUncategorizedमधुमेह …

मधुमेह …

कोणी म्हणे गोड खाऊ नका
मधुमेह जडतो त्याला
शरीरात प्रमाण असेल साखरेचे
तर समजा मधुमेह झाला.

कोणी म्हणे रक्त चेक करा
साखरेचे प्रमाण जास्त दिसता
उपचार त्यावर करा
तर समजा मधुमेह झाला.

कोणी म्हणे लठ्ठपणा झाला
खाण्यावर नियंत्रण ठेवा
तरी फरक नाही ज्याला
तर समजा मधुमेह झाला.

कोणी म्हणे सकस आहार घ्या
योग्यवेळी व्यायाम करा
तरी दुर्लक्ष खूप झाला
तर समजा मधुमेह झाला.

कोणी म्हणे अनुवंशिक आहे
मागच्या सर्वांना जडला
आता माझा नंबर आला
तर समजा मधुमेह झाला.

कोणी म्हणे अवघड काही नाही
गोड खाणे टाळा, सकस आहार करा
तरी लक्ष नाही दिला
तर समजा मधुमेह झाला

कवी – रोहित राजाराम काबदुले
करंबेळे तर्फे देवळे,झोरेवाडी
ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी.
मो. नं. ९५९४५३७९८९.

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular