सुप्रसिद्ध जीवदानी आईच
डोंगरात मंदिर शोभेला
मनाला खूप प्रसन्न वाटते
भेटून जीवदानी आईला
जीवदानी आईच मंदिर
आहे निसर्गाच्या सानिध्यात
आईला पाहण्या भक्तजन
खूप आतुर असतात
भल्या पहाटे उठून
भक्तजन उभे रांगेत असतात
आईच्या दर्शनाची ओढ
प्रत्येकाच्या असते मनात
प्रत्येकाला होते समाधान
जीवदानी आईचे पाहून रूप
आईच्या मंदिरात जाताना
आनंद मिळतो हृदयाला खूप
विरार शहरास मिळते
आईच्या मंदिराने प्रसिद्धी
भक्तांची नेहमीच ये जा असते
जीवदानी आईच्या चरणांशी
विनवणी एकच आहे
जीवदानी आईला भक्ताची
ठेव तुझ्या भक्तजना
आई आनंदात, सदासुखी
कवी – रोहित राजाराम काबदुले.
करंबेळे तर्फे देवळे,झोरेवाडी
ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी.
समन्वयक – पालघर जिल्हा