Homeघडामोडीमनसे चे जिल्हाध्यक्ष चौगुले सह कार्यकर्ते निर्दोष

मनसे चे जिल्हाध्यक्ष चौगुले सह कार्यकर्ते निर्दोष

गडहिंग्लज दि. ३० -: गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयातील मनसेच्या गाजलेल्या आंदोलनातील नऊ जणांची निर्दोष सुटका झाली अशी माहिती अँड सुनीता पाटील यांनी दिली.
अधिक माहिती अशी, १ जून २०१५ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. डॉ. सुनिल कुरुंदवाडे यांना त्यावेळी निरोप देऊन प्रशासनाला इशारा देण्यात आला होता. त्याचवेळी खुर्ची जाळल्याचा आरोप करण्यात आला होता. पण अँड सुनीता पाटील यांनी सर्व आरोप फेटाळत युक्तिवाद केला.
तो न्यायालयाने मान्य करत नऊ जणांची निर्दोष मुक्तता केली. यामध्ये जिल्हाध्यक्ष नागेश चौगले, मनविसे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, तालुकाध्यक्ष शिवा मठपती, युराज लोखंडे, अनिल कावणेकर, अजित पाटील, उदय नाईक, महेश देसुरे, सुशांत सोरटे यांचा समावेश होता.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. 100,000 Backlinks only $10,Subject to data from ahrefs.com.After paid $10 by PayPal (My PayPal:helloboy1979@gmail.com),Tell me your URL, email and comment content.I will complete the task within ten days.But It may take up to a month for the data updated from ahrefs.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular