जन्म एका मातीत
सर्वांचे रक्त एकच ना
दोष फक्त एवढाच
मराठा जातीचा ना
टक्के जरी जास्त
पण काय उपयोग हो
कितीही हुशार असुदे
गरीब राहतोय मागं हो
चाळीस वर्ष आम्ही
आरक्षण साठी झगडतोय
रक्त किती आटवणार
मराठा हा तळमळतोय
पेटती मशाल घेऊन
उभा एकटा बघा खंभीर
मनोज जरांगे पाटील साहेब
मराठ्यांचा एकवचनी आधार
चारशे जातीला आरक्षण
फक्त एका मराठ्याला
का म्हणून वगळताय
हा प्रश्न माझा सरकारला
तोंडावर पाणी मारा
झोपेतून जागे व्हा
मराठ्यांनो उठा रे
हक्कासाठी सज्ज व्हा
कवी:स्वप्नील चंद्रकांत जांभळे
दापोली हातीप.
९६१९७७४६५६


समन्वयक – पालघर जिल्हा