माझा मृत्यू होईल …..
जेव्हा मी या जगात नसेन …….
तेव्हा तुम्ही माझ्या बायकोचं सांत्वन कराल,
माझ्या मुला-मुलीचं सांत्वन कराल,
माझ्या पुर्ण कुंटूबांचं सांत्वन कराल,
आणि ……..
आणि मला हे कधीच कळणार नाही
त्या पेक्षा आत्ताच या मला भेटायला ……..!
कफन ओढून तिरडीवर ठेवतील ……
जेव्हा मी या जगात नसेन ……..
तेव्हा माझे सगळे गुन्हे,
माझ्या सगळ्या चूका,
मी केलेला भांडखोरपना
मी केलेल्या मुर्खपणाला तुम्ही माप कराल
आणि मला हे कधीच कळणार नाही
त्या पेक्षा आत्ताच या मला भेटायला ……!
पांढर्या शुभ्र कफनावर ….
जाळीहार सोडून …..
गुलाबपाणी शिंपडतील ….
जेव्हा मी या जगात नसेन …….
तेव्हा माझी कदर कराल,
मी कितीही वाईट वागलो तरी
माझ्या चांगल्या गोष्टी आठवाल,
आणि मला हे कधीच कळणार नाही
त्या पेक्षा आत्ताच या मला भेटायला ………!
माझा मृत्यू होईल ……..
माझी अंतिमयात्रा निघेल ……
हे पाण्यासाठी मी या जगात नसेन …….
तेव्हा माझ्या फोटोला हार घालाल,
माझ्या फोटो समोर फुले वाहतील,
माझ्या जीवनावर मोठमोठे भाषण द्याल
मग तुम्हाला असे वाटेल की या माणसाबरोबर
थोडा वेळ घालवला असता तर बरे झाले असते
मग या ना, अजून वेळ गेलेली नाही …….
मग आजच या ना …..
मरायचं तर सगळ्याना आहे
परंतू …….
मरावंसं कोणाला वाटत नाही ……. !
मरावंसं कोणाला वाटत नाही ……. !!
मरावंसं कोणाला वाटत नाही …… !!!
कवी - बबन सडवेलकर
(8652157338)

समन्वयक – पालघर जिल्हा