आला आला हो आला
माझा लाडका गणपती आला
दरवर्षीच्या वर्ष्याला
गौरी गणपतीचा सण आला.

माझ्या लाडक्या बाप्पाला
पाहायला कोंकण सज्ज झाला
कोंकणात बाप्पाचे आगमन
पाहून कोंकणकर आनंदी झाला.
घरोघरी बाप्पा माझा विराजमान
भाविक येति मनोभावे दर्शनाला
काजू मोदक उकडीचे मोदक
प्रत्येक जण ठेविती प्रसादाला.
पाच दिवस हे उत्सवाचे
घरोघरी आनंद आणि सुखाचे
सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू देऊन
माझा बाप्पा घेतो सर्वांचा निरोप.
रोहित राजाराम काबदुले.
करंबेळे तर्फे देवळे,झोरेवाडी
ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी.
मो. नं. ९५९४५३७९८९.

समन्वयक – पालघर जिल्हा