HomeUncategorizedमाझी बारोंडा माऊली

माझी बारोंडा माऊली

डोंगरावरी जाऊन बसली
माझी बारोंडा माऊली
माझ्या माऊलीला पाहण्या
भक्तजन आतुर होई.

चहूबाजूंनी निसर्ग नटला
माझ्या बारोंडा माऊलीसाठी
दर्शन घेण्यास भाविक येती
ते आनंदाने प्रफुल्लीत होती.

माऊलीचे रूप पाहून
मना लाभते शांती
माझ्या माऊलीला भेटण्यास
सदैव ओढ लागते मनास.

भक्तांना दर्शन देण्यास
नेहमीच असते तत्पर
आशीर्वाद देऊनी माऊली
सर्वांना ठेविते सुखात.

विरार शहरास लाभली
माझी बारोंडा माऊली 
नजर ठेऊनी भक्तांवरी
नेहमीच सांभाळ करी.

माझी बारोंडा माऊली
आहे कृपेची साऊली
मस्तक चरणांवर ठेऊनी
नमस्कार करितो तुजला आई.

    रोहित राजाराम काबदुले.
   करंबेळे तर्फे देवळे,झोरेवाडी
   ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी.
   मो. नं. ९५९४५३७९८९.
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular