Homeमुक्त- व्यासपीठमाणूस याच नाव

माणूस याच नाव

देवाने सर्वात हुशार आणि सुंदर बुध्दिमत्ता असणारा. वेळ येईल तसा वागणारा प्राणी तयार केला त्याला माणूस असे नाव
माणसाला जन्मापासून सुख दुःख चांगले वाईट. सकारात्मक नकारात्मक. कसे गुण आहेत त्यातला सर्वात महत्वाचा गुण आहे तो म्हणजे विसरायचा. आपल्या जीवनात चांगल्या वाईट घटना गोष्टी आपण लवकरच विसरतो आणि आपल्या कामाला लागतो म्हणजे. आपले सगेसोयरे मृत्यू पावलेल्यास एक ठराविक वेळेपर्यंत आपण दुःख पाळतो आणि त्यांना आपण विसरून जातो. शासकीय योजना यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांचेकडून झालेला मानसिक त्रास. झालेली आर्थिक लूट आपण लवकरच विसरतो. कामगार कल्याण योजना. अपंग योजना. निराधार. वयोवृद्ध यांच्यासाठी असणार्या योजना यासाठी होणारी फसवणूक आपणं लवकरच विसरतो
कोरोना सारखे महाभयंकर महामारी संकटाने थैमान घातले होते टाळेबंदी जारी करण्यात आली होती. लोक घरातच जीव वाचवण्यासाठी अडकून पडले होते. उपाशीपोटी राहून पण शासन सांगेल त्या नियमानुसार जगत होती. त्यावेळी आपल्यावर झालेला अनयाय. मग तो शासनाचा असो अथवा टाळेबंदी काळाचा फायदा उचलणारे. भाजी पाला विक्री करणारे. दुध. अन्न धान्य विक्री करणारे. किराणा दुकानदार यांची मनमानी पद्धतीने घेण्यात आलेला दर. पोलिसांचा मार मास्क साठी होणारी अडवणूक.टाळेबदी काळात वेळेचा फायदा घेऊन जादा व्याजदराने कर्जपुरवठा करणारे लोक. वेळेचा पुरेपूर फायदा घेऊन टाळेबंदी काळात पैसाच मिळवला काही लोकांनी याचवेळी. ग्रामीण भागात शहरी भागात महानगरपालिका क्षेत्रात कर्मचारी व अधिकारी यांच्या सर्वसामान्य जनता यावर केलेला मनमानी व्यवहार आपण सर्वजण हे सर्व विसरून जातो कारणं माणूस याच नाव
कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी शासनाने विविध अन्न धान्य योजना सुरू केल्या गोरगरिबांसाठी पण रेशन दुकानदार व पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे लागेबांधे असल्यामुळे खरोखरच उपाशी असणार्या लोकांना काहीच मदत नाही एका बाजूला जनता. टाळेबंदी मुळे उपाशी मरत होती त्याचवेळी आपल्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी टनाने बोगस तांदूळ सापडत होता कुठुन आला ? शासकीय गोदाम मधून गाड्या विकल्या नसतील कशावरून राईस मिल वाल्यांना. टाळेबंदी काळात रेशन दुकानदार यांनी रेशन अन्न धान्य आल नाही ? नाव दिसतं नाही ? थम उठत नाही ? यापेक्षा वेगळ म्हणजे टाळेबंदी काळात जेव्हा या रेशन दुकानदार यांची जनतेला गरज होती त्यावेळी रेशन दुकानदार यांनी विमा कवच मिळावे यासाठी बंदचा इशारा दिला होता. याचवेळी जे जे दुकानदार संपावर जाणार आहेत त्यांचे दुकान लाईन्स रद्द केले पाहिजे होते. टाळेबंदी काळात काही रेशन दुकानदार यांचे परवाने रद्द केले अशी बातमी प्रसिद्ध झाली खरोखरच ती दुकाने आजही बंद आहेत का ? रेशन साठी वाटप करण्यासाठी शासनाकडून आलेल्या अन्न धान्य मध्ये. आजही आपल्या जिल्ह्यात हरभरा शिल्लक आहे असं शासननिर्णय सांगतो. म्हणूनच माणूस याच नाव
आपल्या जिल्ह्यात परवाचा नाही तर सतत आलेला पूर. या परिस्थितीला आपणच कारणीभूत आहोत. वाढती लोकसंख्या यामुळे निर्माण होणारी रहाण्याची समस्या पण एक महत्वाचं सत्य आहे ते म्हणजे लोकसंख्या वाढली पण जमीन वाढली नाही मग आपणं गावातून बाहेर घर बांधायला लागलो हळूहळू आपण जागोजागी सिमेंटची जंगले उभी केली त्यामुळे जमीनीत जाणारे मुरणारे पाऊसाचे पाणी मुरणे बंद झाले आणि वेळोवेळी महापूर येण्यास सुरुवात झाली. वृक्ष तोड बदलते वातावरण यामुळे अतिवृष्टी होण्यास सुरुवात झाली. परवाचा पूर आपण सर्वांनी बघितला आहे माणस. जनावरें. कुत्री. कोंबड्या. शेती. घर. याच मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. समाजातील काही लोकांनी पूरग्रस्त भागातील लोकांना अन्न धान्य कपडे याची मदत पोहोचविली पण ज्याच्या घरांत पाणी घुसले त्यांचे नुकसान झाले त्यांना मदत मिळालीच नाही. आणि ज्यांच्या दारात सुध्दा पाणी आल नाही त्यांच्या घरात अन्न धान्य मुबलक गेलं. गावातील प्रमुख ज्यांच्याकडे वाटप करायला गेलं त्यांनी आगोदर आपली घर भरली. शासनाने पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि पंचनामे चालू झाले त्यात सुध्दा गोलमाल झालं ज्याचं घर पडून जमीनदोस्त झाले आहे त्याला काहीच आर्थिक लाभ नाही. आणि ज्यांच्या घराच्या उंबरठ्यावर सुध्दा पाणी नाही त्यांना पूर्ण भरपाई मिळाली. शेती नुकसान भरपाई मिळविण्यासाठी सर्वे करणार्या अधिकारी व कर्मचारी यांना खरोखरच भरपाई मिळावी म्हणून लाच सुध्दा दयावी लागत आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना मदत म्हणून १० किलो तांदूळ. १० किलो गहू. ५ किलो तुरडाळ. केरोसीन. असे वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले होते वाटप झाले किती झाले कुणाला माहीत?
नगरपालिका बिगूल वाजायला लागले. गाठीभेटी. मिटिंगा. कोपरासभा. मतदार अडचणी जाणून घेण्यासाठी सुरवात झाली. कोरोना काळात टाळेबंदी जारी झाली तुम्ही घरातच अडकून पडला त्यावेळी एकतरी आला होता का ? तुम्ही काय खायाय. जगलाय का मेलाय. बघायला. आत्ताच आपली काळजी यांना का ? लोकांनी आपली मानसिकता बदलाच्या ची गरज आहे कारणं अशा राजकारणी लोकांना माहीत आहे गेल्या वर्षी १००० वाटले आत्ता काय २००० हजार वाटायला लागतील. जनता मूर्ख आहे खुळी आहे मटनाच जेवन दारु. यापुढे सर्व निर्थक आहे. बघा आपली पाच वर्षांची किंमत काय आहे ? विचार निर्णय बदला आपल्या बाजूने जे कोणी उभे राहिले. अडचणी काळात तुम्ही सुद्धा त्यांच्याच बाजूने उभे रहा आपल मत विकू नका रास्त मत रास्त निवड पण आपली एक मानसिकता आहे की आपण सर्वजण हे सर्व विसरतो

  • अहमद नबीलाल मुंडे
    ( RTI कार्यकर्ते )
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular