Homeघडामोडीमी ग्रामपंचायत मधून रिडायर होतोय- आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील

मी ग्रामपंचायत मधून रिडायर होतोय- आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील

औरंगाबाद : गेल्या पंचवीस वर्षांत पासून औरंगाबादमधील पाटोदा गावाला राज्यभर ओळख देणारे विकास पुरुष भास्करराव पेरे पाटील हे सर्वपरिचित नाव. यांनी गावच्या राजकारणातून आता निवृत्ती घेतलीय. पाटोद्यात निवडणूक व्हायची पण पेरे निर्विवाद बाजी मारायचे. मात्र यावर्षी पेरे पाटलांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपला पॅनलची उभा केला नाही.

बाकीच्यांना देखील संधी मिळायला हवी 
भास्करराव पेरे पाटील म्हणाले की, मी आपल्यापुढे, समाजापुढे काही नाही. इथं लोकशाही आहे. त्यामुळं मी फॉर्म देखील भरला नाही. माझे वय 60 झाले आहे. 

मी रिटायरमेंट घेतली आहे. माझ्यापेक्षा दुसरा कोणी चांगले काम करू शकतो. माझ्याकडून जेवढे गावासाठी करणे होते तेवढे केले. मीच का सरपंच व्हायचं. बाकीच्यांना देखील संधी मिळायला हवी, असं ते म्हणाले. पेरे पाटील म्हणाले की, यापुढेही कुणी माझा सल्ला घेतला तर सल्ला देण्यास मी नक्की तयार असेल. माझ्या गावचे इलेक्शन 5 हजारात होणार आहे. गावचे पुढे काय करायचे ते गावकरी ठरवतील. मला दररोज 500 किमी फिरावे लागते. असेच फिरत फिरत कलाम साहेबांसरखे जीवन सोडायचे आहे. जो खुर्चीवर बसला त्याने काय करायचे ते ठरवायचे असते. तिथं कोण बसलाय हे महत्वाचे नाही. मी कोणत्याच पक्षाला आतपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये घुसू दिले नाही, असं ते म्हणाले.
घरकुलासाठी 5 हजार लागत नाहीत. त्याचा टॅक्स भरावा लागतो त्याला लागतात. सरपंच घरकुल देत नाहीत. तर सरपंच फक्त कागदपत्रं पोहोचवू शकतो असं ते म्हणाले.
मी मागच्या पंचवार्षिकला ठरवले होते मला उभे राहायचे नाही. माझ्या मागे अनेक व्याप आहेत.  माझी मुलगी लहाणपण पासून म्हणत होती तिला सरपंच व्हायचंय ; तिला विचारलं तुला सरपंच व्हायचंय का ? तर ती हो म्हणाली. माझ्या मुलींनी आता चांगलं काम करून दाखवावं, असंही ते म्हणाले.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

               राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. तर १८ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते. परंतु, कोविड-१९ ची परिस्थिती उद्‌भवल्याने १७ मार्च २०२० रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित केला.  त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular