Homeमुक्त- व्यासपीठमी तर सपशेर माघार घेतली ; तुमच्याने काय होतंय का बघा...

मी तर सपशेर माघार घेतली ; तुमच्याने काय होतंय का बघा…

तो :काय ग! फोन केला होतास ना? मी कामात होतो ना म्हणून घेतला नाही. बोल काय काम होतं ?


ती :अरे आमच्या कॉलेजमधे उद्या कायतरी मराठी speaking लोकांचा day आहे. मला ना nine yard

ती -: नौवार saree घालायची आहे.

तो :सारी नाही ग साडी. साडी नेसतात आणि कपडे घालतात.
बर ती नववारी तुझी तूच नेसशीलच ग. त्यात मी काय मदत करणार ? मला कशाला फोन केलास ?


ती: अरे big problem झालाय. मला मराठीतनं speech द्यायचय. ते कोण poet आणि writer होते ना कुसुमाग्रज. त्यांच्या बद्दल speech द्यायचय. माझा project आहे. तुझी मराठी language मस्त आहे ना. So please माझी help कर ना. By the way हे असलंकसलं नाव आहे ना ‘कुसुमाग्रज’! शाळेत सगळ्या friends आणि teachers ना या नावाने बोलताना किती problem झाला असेल नाही.यांना पण खूप odd feel होत असणार ना !
( ही आता तिच्या दिव्य मराठीत भाषण देणार या विचारानेच माझ्या पोटात भीषण गोळा आला. पण करतो काय? अशा खास मैत्रिणीला एवढी तरी मदत करायलाच हवी.) वरकरणी मी म्हणालो.

तो: अग कुसुमाग्रज हे त्यांच टोपणनाव आहे. म्हणजे pen name. त्यांचं खर नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर ‘.
कुसुम हे त्यांच्या धाकट्या बहिणीचे नाव. तिच्या आधी जन्माला आलेला भाऊ म्हणजे अग्रज. एकत्र करून होते’ ‘कुसुमाग्रज’! कळलं का?

ती :किती difficult आहे हे understand करायला. बर तू मला main main points सांग ना. मी ते write down करते.

( आता हिला कुसुमाग्रज असे मुद्द्यात कसे सांगणार? मुळात हिने कुसुमाग्रजांची एकही कविता वाचली नाही की कादंबरी वाचली नाही. तिला असे कुसुमाग्रज केवळ नववारी नेसून आणि पाच मिनिटे फोनवर बोलून समजणार आहेत का ? )


तो : हे बघ आपण यावेळी कॉलेज मध्ये विकिपीडिया वरची माहिती वाचून दाखवूया. तुला खरच काही प्रमाणात तरी मराठी भाषा त्यातलं साहित्य यात काही कळावं असं वाटतय का?मराठी भाषा नीट लिहिता बोलता यावी असं वाटतय का ?

ती :मला आधीच येत ना मराठी. त्यात कायपण difficult नाही.

तो :अग तू उद्या नववारी नेसणार आहे ना? त्याबरोबर गळ्यात हार , कपाळावर चंद्रकोर, हातात बांगड्या पायात पैंजण, नाकात नथ घालशील ना? तरच तुझा पेहराव पूर्ण वाटेल ना ? तसच एका इंग्रजी वाक्यात चार दोन मराठी शब्द वापरले की मराठी आली असं होत नाही. आपण ना काना, मात्रा, वेलांटी संधी, समास, वृत्त अशा अनेक दागिन्यांनी नटलेली मराठी भाषा शिकूया. बघ आहे का तुझी तयारी ?

ती : तू ना too much आहेस. माझी मदत तर करत नाहियेस उलटा मलाच lecture देतोयस. जाऊ दे मला वाटलच होतं की तू असाच behave करणार. मी करते माझंमाझं manage.

तो.: यांना मराठी शिकवायला कुसुमाग्रजच काय प्रत्यक्ष ज्ञानेश्वर आले ना तरी काही होईल असे वाटत नाही. यावर कोणाला काही उपाय सुचतोय का बघा. मी तर सपशेल माघार घेतलीय.

  • डॉ . समिधा गांधी

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

लेखक व कवींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी लिंक मराठी हे न्यूज पोर्टल घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी .
तुमचे स्वलेख नावासह प्रसिद्ध केले जातील ; यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular