Homeवैशिष्ट्येमी मावळा शिवरायांचा…

मी मावळा शिवरायांचा…

श्री. छत्रपती शिवाज महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची आजच्या पिढीने दाखल घेऊन आजच्या काळात या स्वराज्यासाठी काय केले पाहिजे यावर मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.

श्री. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अवघ्या पन्नास वर्षांच्या कालावधीत साडे तीनशेहुन अधिक किल्ले बांधले, विशेष म्हणजे इतक्या वर्षांनीही हे किल्ले जसेच्या तसे आहेत. काही अवशेष ढासळलेले दिसतात ते औरंगजेब आणि त्यांच्या सैन्याने नासधूस केल्यामुळे.
जर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अजून दहा वर्षे जरी जगले असते तरी अक्खी सुलतानी फौजेचा पायमोड केला असता; हे मी नाही तर औरंगजेब यांनी स्वतः लिहून ठेवले आहे.

आपली आजची पिढी आहे तिला फक्त छत्रपती शिवाजी महाराज माहीत आहेत, परंतु त्यांचे कार्य, घेतलेली मेहनत, मावळ्यांनी सांडलेले रक्त आणि महाराजांप्रति असलेली मावळ्यांची निष्ठा, याचे ज्ञान आजची पिढी घेत नाही. फक्त गडांवर जायचे, मस्स्त फिरायचे, फोटो काढायचे, आता नवीन फॅड आलाय,- लग्नाचे प्री वेडिंग शूट – गडांवर जाऊन करतात. अरे लाजा वाटल्या पाहिजेत अशा नालायक लोकांना, ती जागा या गोष्टींसाठी आहे का ?
गडांवर जा, फिरा, एक-दोन फोटोही काढा, पण तिथे जाताना एक पेन आणि वही घेऊन जा. तिथली माहिती लिहून काढा, तिथला इतिहास जाणून घ्या, तिथे गेल्यावर त्या गडाच्या संवर्धनासाठी आपल्याला काय करता येईल याची नोंद करून घ्या. पडलेला कचरा दिसला तर उचलण्यास सुरवात करा, जेणे करून तुमच्याकडे बघून इतरही याची सुरवात करतील आणि तुमच्याकडून त्याची सुरवात होईल.
शिवाय भविष्यात प्रत्येकाच्या याच कृतीतून गड-किल्ले सुंदर दिसायला लागतील.

आज अनेक संस्था हे गड-दुर्ग आहे त्या स्थितीत राखण्याचे कार्य करीत आहेत. त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. उद्या आपलीच मुलं आपल्यालाच विचारतील छत्रपती शिवाजी महाराज कोण होते ?
त्यावेळी काय कराल ? घ्याल ना स्वतःच्याच कानफटात मारून !
म्हणूनच आज आपण स्वतः या गोष्टींचा अभ्यास करून महाराजांबद्दल जाणून घेतले पाहिजे.

आपल्या देशात फक्त महाराजांना राजकारणासाठी वापरले जाते, त्यांचे इच्छित ध्येय गाठले की , कोण ? कुठले ? महाराज…!! अशीच काहीशी परिस्थिती आज उद्भवलेली पाहायला मिळते. आज शासनाकडे फक्त पन्नास ते त्रेपन्न किल्ले संवर्धनासाठी आहेत, तरीही त्या किल्यांची व्यवस्थित निगा राखण्यास शासन असमर्थ आहे. कितीतरी कचरा आणि घाण किल्यांवर केली जाते परंतु त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. ना सरकारचे, ना तिथे फिरायला जाणाऱ्या लोकांचे.
म्हणूनच काही संस्था निर्माण झाल्या आणि गेल्या काही वर्षांपासून हे दुर्ग जोपासण्याचे कार्य करीत आहेत.
आपणही त्यांना त्यांच्यासोबत राहून सहकार्य करायला हवे.

अनेक पुस्तके महाराजांवर लिहिली गेली आहे, त्यांचे वाचन अवश्य करा, त्यातून आपल्याला त्यांनी वापरलेली वेगवेगळी नीती, गनीम कावा म्हणजे काय ? त्यांचा दृष्टीकोन याचे ज्ञान मिळेल. याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनातही करता येतो. एखादी गोष्ट करताना त्याचे नियोजन कसे करावे, ते अमलात कसे आणावे याचे ज्ञान नक्कीच मिळू शकते.
परंतु आपण पुस्तके वाचण्यात रस दाखवत नाही, तेच एखाद्या सिनेमाला जायचे असेल तर लगेच वेळ काढतो.
ही आपली प्रत्येकाची शोकांतिका आहे, अरे आज आपण पुस्तकं वाचली तर आपली मुलेही पुस्तकं वाचतील.
शिवाय आपल्या कार्यातूनच आपली मुले कृती करत असतात हे लक्षात ठेवा. म्हणूनच लहानपणापासूनच त्यांना पुस्तकांची आवड निर्माण करा.

प्रत्येकाने शिवरायांचा एक तरी गुण अवलंबला तरी खूप आहे, पण त्यासाठी सर्वात आधी महाराज समजून घ्यावे लागतील, खूप वाचन करावे लागेल. आचरणात आणावे लागेल तेव्हाच इतरांना ठामपणे आपण सांगू शकू की, होय मी शिवरायांचा मावळा आहे.

गडदुर्ग संवर्धनाच्या अनुषंगाने एक मी लिहिलेली स्व-रचित कविता इथे सादर करीत आहे. वाचा- त्यातले शब्द समजून घ्या, विचार करा तसेच आपण काय करतोय आणि काय केले पाहिजे हे स्वतःलाच विचारा.

धन्यवाद…!!💐
🚩🙏जय शिवराय🙏🚩

🙏( माफ करा “महाराज” थोडं परखड लिहिलंय…)🙏
🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय…🚩

आम्ही खांद्यावर घेतो, आम्ही डोक्यावर घेतो
आम्ही पालखीत बसवून नाचवतो, आम्ही मिरवतो
वर्षानुवर्षे आम्ही फक्त हेच करतो, आणि करतोय
जेव्हा वेळ येते खऱ्या रक्षणाची, तेव्हा आम्ही माती खातोय…

“छत्रपती शिवाजी महाराज की जय” घसा फोडून ओरडतो
डीजे लावून मिरवणुका काढतो, ढोल ताशे वाजवतो
पाय उडवत त्या कुठल्यातरी सिनेमाच्या गाण्यावर थिरकतोय
पोटात दोन घोट घेऊन जगाला आम्ही “महाराज” शिकवतोय…

गडी डोक्यात फेटा चढवून ऐटीत, रुबाबात गल्लीगल्लीत फिरतो
गडावर जाऊन धिंगाणा घालून, फुकटात फुकटची फुकत बसतो
लाज-शरम सोडलेय सगळी, तरी पुन्हा ओरडून मलाच म्हणतोय
“शिवाजींचा मावळा” आहे मी, तू का? माझी सगळी सोलतोय…

सगळ्यांना “महाराजांच्या” नावाने जगायचंय,
छाती पुढे काढून “मी मावळा” हाय सांगायचंय, पण…
आज गड ढासळतोय, कोण पुढे येण्यास सरसावतोय ?
जेव्हा वेळ येते खऱ्या रक्षणाची, तेव्हाच आम्ही माती खातोय…

✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर – आण्णा

http://linkmarathi.com/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%a3-%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a5%8b-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%86/
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

9 COMMENTS

 1. तुमच्या कडून अश्याच लेखनाची अपेक्षा असते ; आपल्या लेखनातून किमान दोन खरे मावळे जन्माला आले आणि त्यांनी छ. शिवाजी महाराजांचा एक गुण आत्मसात केला तरी तुमचे लिखाण नव्हे तर तुमचा जन्म सार्थकी लागला .
  तुमचा आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय…

  • नमस्कार सर🙏
   खरं तर आज तरुण पिढीने स्वतःहून स्वतःला या कार्यात सामील करून घ्यायला हवे, तरच पुढच्या पिढीपर्यंत इतिहास पोहचू शकेल.

   मी हा लेख लिहिण्याचा हाच उद्देश आहे की, लेख वाचून तरुणांनी तर पुढे यावेच आणि सर्व वयोगटातील लोकांना8 एकत्र येऊन इतिहासाची जपणूक करावी. महाराजांनी व त्यांच्या मावळ्यांनी इथे रक्त सांडून हे गड-किल्ले उभे केलेय, आज त्यांच्यामुळेच या महाराष्ट्रात श्वास घेतोय, मग आपण सर्व मिळून ते टिकवण्यासाठी नक्कीच प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.
   🚩जय शिवराय🚩

  • खूपच सुंदर लेख आहे… खरंच पुस्तक वाचन खूप गरजे चे आहे…तुझे काव्य तुझे महाराजान बद्दल चा तुझा आदर …तुझी त्यांचा विचारांची जान दाखवते….आज छा पिढी ने खरंच महाराजांचा १जरी गुण अवलंबला तरी ते त्यांचा आयुष्यात खूप काही मिळवतील आणि त्यांचा पुढच्या पिढीला एक नवीन आदर्श निर्माण करतील ….विजय तुझे खूप खूप अभिनंदन असेच आपले विचार मांडत राहा…💐💐💐

   • 🙏नमस्कार सर..
    होय सर, आजच्या पिढीला वाचनाची आवड असणे अत्यंत गरज आहे, वाचन वाढले तरच विचारांची वृद्धी होईल, आणि याच विचारांतून सत्कार्य घडेल, घडणार आहे.

    सर, आज आपल्याकडून मिळालीली कौतुकाची थाप अशीच कायम असुद्या. आपल्या सुंदर अभिप्रायाबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद…!!💐

- Advertisment -spot_img

Most Popular