अकोला (प्रतिनिधी ) – गेल्या काही दिवसांत विदर्भातील कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं चिंता वाढल्या. मध्यरात्रीपासून अकोल्यात नवे कडक निर्बंध जारी करण्यात आलेयेत. विदर्भात अमरावती, अकोला, वर्धा आणि यवतमाळमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण सापडतायेत. अकोला जिल्ह्यात यावर्षी जानेवारी महिन्यात 1212 नवे रुग्ण आढळले होतेय. तर फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवाड्यात तब्बल 939 रुग्ण आढळलेयेत. जानेवारीच्या तुलनेत फेब्रूवारी महिन्यात जिल्ह्याचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ 6.4 टक्क्यांवरून 10.90 टक्क्यांवर पोहोचलाय. अकोला जिल्ह्यात मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करण्यात आलं असून जिल्हा प्रशासनानं जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

मुख्यसंपादक