Homeमनोरंजनयुट्युबर्सचा (You tube ) शाश्वत विकास करतोय सर्व कोकण (कोकण )...

युट्युबर्सचा (You tube ) शाश्वत विकास करतोय सर्व कोकण (कोकण ) भकास     

     https://youtu.be/gSO8e0s_NjM

    आजकाल पैसे कमावण्याचे एक साधन म्हणजे युट्यूब चॅनल. अनेक हौशी माणसे पर्यटनावर चॅनल्स चालू करतात, बरेच स्थानिक प्रदेश व जीवनशैली चॅनल्सवर दाखवतात, आपल्याला पण ते सर्व कधी पाहिले नसल्यामुळे खूपच इंटरेस्टिंग वाटते. एखादा unexplored व unseen निसर्गरम्य ठिकाणे व महत्वाचे अधिवास शूट करून आपल्या युट्युब चॅनेल्सवर दाखवले की झाले काम.....पर्यटकांची गर्दीच गर्दी व युट्युबर्सची चलती सुरू होते.

   यासाठी मग कोणता यूट्यूबर कोणत्या भूलथापा मारून कोणत्या थराला जाईल याचा काही नियम नाही.स्वतःचे चॅनल सर्वात बेस्ट बनवण्यासाठी मग हे so called युट्युबर्स विविध हॉटेल व्यावसायिकांकडून स्पॉन्सरशीप मिळवून, इकडे शाश्वत विकास व इको टुरिजमची फोडणी देऊन कोकण व परिसरातील unseen व untouched ठिकाणे पण सर्व जगासमोर उघडकीला आणतात व इथेच खऱ्या अर्थाने सुरू होतो निसर्गातील परिसंस्थेचा व नैसर्गिक अधिवसाचा ऱ्हास.

एक कोकणवासी म्हणून आम्हाला पडलेले काही बेसिक प्रश्न मी इथे सर्वांसमोर मांडू इच्छितो,

       आंबोली, तिलारी, चोरला या घाटातील जंगलात व अभयारण्यातील इको सेन्सिटिव्ह जागेत मोठमोठाले रिसॉर्ट्स बांधून तेथील वृक्षतोड करून नैसर्गिक परिसंस्थेची वाट लावून कोणता निसर्ग दाखवणार आहेत हे so called युट्युबर्स?

इकडे शाश्वत विकासाच्या गप्पा मारायच्या आणि इकडे पर्यटकांना unseen व enexplored ठिकाणे दाखवून त्या ठिकाणांची प्लॅस्टिक बाटल्या, दारूच्या बाटल्या व इतर कचऱ्याचा ढीग तयार करायचा, हेच पैसे कमावण्याचे एकमेव साधन आहे का या so called युट्युबर्सना?

तिलारी धरणाच्या बॅकवॉटरला पर्यटकांना नेऊन काय साध्य करणार आहेत हे so called युट्युबर्स? का तिथेही रिसॉर्ट्स बांधून पर्यटकांना वाघ, बिबट्या, किंग कोब्रा दाखवायचा प्लॅन आहे?

केंद्रे मुळसच्या जायफळाच्या राईत पर्यटकांना नेऊन काय साध्य करणार आहेत हे so called युट्युबर्स? जी राई तेथील स्थानिक गावकऱ्यांनी गेली २०० वर्षे जपली त्या राईची गेल्या दोन वर्षात वाट लागली आहे. याचे मूळ कारण ती प्रमाणाबाहेर explore करून टाकली आहे फक्त न फक्त काही युट्युब views मिळवण्यासाठी.

कोकणातील अशी अनेक दुर्गम व untouched, unseen व unexplored ठिकाणे पर्यटकांना दाखवून कोणता शाश्वत विकास करणार आहेत हे युट्युबर्स?

या युट्युबर्सना एवढे ही साधे गणित कळत नसेल का जिथे जंगली प्राण्यांचा अधिवास आहे, पाणवठा आहे तिथे जाऊन एक तर आपण त्यांचा अधिवास धोक्यात आणत आहोत आणी वर तिथे ड्रोन फिरवून, गोप्रो कॅमेरा फिरवून तेथील अधिवासात अतिक्रमण करून बाकीच्या लोकांना खुले आवाहन करत आहोत…….की या पर्यटकांनो या, इकडे या, हे बघा, ते बघा, ही बघा नदी, तो बघा पाणवठा, ते बघा पगमार्क्स, इथे चुली पेटवू, इथे night कॅम्प फायर करू……अरे अशाने शाश्वत विकास तर सोडा दूरच, जे काही कोकण शिल्लक आहे ते भकास होणार आहे……and its guranted.

       तुम्ही ज्या likes व कंमेंट्स मिळवण्यासाठी व पुढे जाऊन युट्युबच्या माध्यमातून views च्या तकलादू अमिषापोटी हे जे काही उद्योग करत आहात ना ते कोकणातील सर्व पर्यावरण व परिसंस्था एक दिवस नष्ट करणार आहे हे लक्षात घ्या.

       अरे करा ना प्रोमोशन, करा ना business, करा ना रिसॉर्ट व homestay पण जरा तारतम्य बाळगा. इकडे लोकांना आवाहन करायचे की या कोकणात या आपण शाश्वत विकास करूया व इकडे रिसॉर्टशी भागीदारी करून सगळा कोकण explored करून टाकायचा म्हणजे त्याचे महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळा करायला मोकळे. हे म्हणजे असे झाले की, “बडी बडी बाते आणी वडापाव खाते.”

        पर्यटक तिथे येऊन काय काय करून जातात आणी काय काय करून गेलेत याचा कधी पाठपुरावा केला आहे का या so called युट्युबर्सनी? नाही करणार ते याचा पाठपुरावा……कारण एकदा त्यांचे खिसे भरले की हे झाले मोकळे दुसरे पर्यटक शोधायला….या सर्वाचा त्रास कोकणातील स्थानिक लोकांना व स्थानिक वन्यजीवांना, निसर्गाला होत आहे.

     आज इकडे तिलारी घाट, चोरला घाट, म्हादेई, मांगेली या भागात तर दर किलोमीटर ला रिसॉर्ट्स होत आहेत, रबराची शेती राजेरोसपणे केली जात आहे, अननसाच्या बागाच्या बागा डोंगर व्यापत आहेत, दुर्मिळ प्राणी किंग कोब्रा, लाजवंती याची बेमालूमपणे तस्करी होत आहे, भेरली माडाच्या झाडांची राजेरोसपणे कत्तल करून परप्रांतीय लोक कोकणात असणाऱ्या मलबार धनेश व अनेक पक्ष्यांना धोका पोहचवत आहेत, मायनिंगच्या नावाखाली सगळा सह्याद्री पोखरला जात आहे…अरे तुम्हाला शाश्वत विकास करायचा आहे ना?
मग घ्या ना हे मुद्दे….

मांडा की हे सर्व लोकांच्या समोर युट्युबच्या माध्यमातून…..

          मग आमच्यासारखे समस्त कोकणप्रेमी येतील तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला. या मुद्यावरून लढायला सर्व निसर्गप्रेमी येतील. फक्त शाश्वत विकास करायचा, ecotourism वाढवायचे व biodiversity जतन करायची हे सांगून लोकांची दिशाभूल करणे थांबवा आता…..बस्स खूप झाले.

      आम्हाला या युट्युबर्सना फक्त एवढेच सांगायचे आहे की, आपण जंगल, अधिवास, परिसंस्था या तयार करू शकत नाही. हे सर्व तयार होणे ही अत्यंत क्लिष्ट गोष्ट आहे. एक सुदृढ जंगल, अधिवास व परिसंस्था तयार व्हायला कमीतकमी हजार वर्षांचा कालावधी लागतो.
त्यामुळे स्वतःला वेळीच रोखा व स्वतःवर आवर घाला.

निसर्ग व पर्यावरणाची प्रामाणिक तळमळ आहे म्हणून एका कोकणप्रेमी व कोकणवासीयाकडून हा लेखप्रपंच, सूज्ञ लोक बाकी इतर गोष्टी समजून घेतीलच.

  • – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
    ✍ एक निसर्गप्रेमी कोकणवासीय
  • सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular