Homeसंपादकीययुवा पिढी चुकतेय का…???

युवा पिढी चुकतेय का…???

आता सध्या राज्यात किंवा संबंध देशात वातावरण पुर्णपणे दुषित होत आहे. प्रत्येक युवकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. हे राजकीय नेते दररोज एक मुद्दा उकरून काढतील. हा विकला गेलेला मिडीया दररोज एकमेकांना प्रश्न विचारत राहणार आहे.. हा असं म्हणला त्यावर तुमच काय मत आहे आणि तो तस म्हणला त्यावर तुमचं काय मत आहे…???
आपणं युवा पिढी हे ह्यांचच ऐकत बसणार आहे का…??? उद्या कोणीही नेता उठेल आणि स्वताचा राजकीय स्वार्थ समोर ठेवून आपल्या रस्त्यावर तलवारी घेऊन उभा करेल..आपण अशांना बळी पडावं का…?? आपले आई वडील भाऊ शेतात कष्ट करत असतात आपल्या बाबत मोठ मोठी स्वप्नं बघत असतात… उद्या आपण कोणत्यातरी नेत्यांच भाषण ऐकून एकमेकांवर चालून गेलो.. गुन्हे दाखल झाले आपले नाव ब्लॅक लिस्ट मध्ये पडले कि आपण कोणत्याही सरकारी नोकरी साठी पात्र ठरत नाही याची जाणीव आजच्या तरुणांना आहे का…???
सध्या आपल्या देशाचा शत्रू कोणीही दुसरा तिसरा नसुन गरिबी आहे.. ती दुर करण्यासाठी आपणं व्यक्तीगत पातळीवर काय प्रयत्न करतोय…???
का आपण युवा पिढी नेत्यांच ऐकून जात, धर्म, देव यातच अडकून पडणार आहे का…??
जन्मावर जात अवलंबून नसते. कर्मावर जात अवलंबून असते प्रत्येकांने आपली कर्म चांगली ठेवली पाहिजे.
आणि विशेषत म्हणजे इथुन पुढच्या काळामध्ये कोणताही नेता निवडणूकच्या वेळी प्रचार करायला आला का त्यांना सक्त बजावले पाहिजे तुम्ही मतदान मागताना विरोधी पक्षातील लोक असे आहेत तसे आहेत, ते ह्या जातीचे आहेत, ते ह्या धर्माचे आहेत हे असलं काहीही न बोलता तुम्ही आमच्या साठी काय करणार आहात…???
गरिबी, बेरोजगारी, किंमतवाढ कमी करण्यासाठी काय करणार आहात..???


शेतकरी, कामगारांसाठी काय करणार आहात…???
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यासाठी आपल्या उपाययोजना काय आहेत..???

फक्त यावरच भाषण करा आम्हाला तुमच्या विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल अजिबात काहीही सांगू नका…
अशी ताकीद जनतेने नेत्यांना दिली पाहिजे…???

आपणं सामान्य कुटुंबातील लोकांनी मतदान करतानाही नेत्यांची बोलबच्चन भाषणशैली, कडक कपडे, त्यांची संपत्ती बघून मतदान न करता तो नेता गोरगरीबांचे किती कल्याण करू शकतो याबाबत विचार करून लोकप्रतिनिधीची निवड केली पाहिजे कारणं त्यांच्या एका एका निर्णयावरती आपलं भविष्य अवलंबून असतं….

लेखक-
रमेश पवार (पंढरपूर)

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular