Homeमुक्त- व्यासपीठयुवा शक्तीचे संघटन

युवा शक्तीचे संघटन

कोणत्याही राष्ट्रामधल्या शक्तीचे आणि भवितव्याचे मोजमाप तेथील युवा वर्गांच्या सद्य स्थितीवरून करता येते.त्यांचे सळसळणारे रक्त समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देते. प्रगतशील राष्ट्रातील युवा आणि प्रगत राष्ट्रातील युवा यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला असता भारतासारख्या प्रगतशील देशात युवा वर्गात महत्त्वाकांक्षेचा जन्म झालेला दिसून येतो. येथील मुले स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण करण्यास प्रयत्नही करतात.आजच्या घडीलाही शेतीप्रधान देशामध्ये, हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या तुरळक प्रमाणातच घरांमधून मुलांच्या शिक्षणासाठी अनुकूल परिस्थिती आहे. शहरातील मोठय़ा प्रमाणात लोकसंख्या या सत्यापासून अनभिज्ञ असली तरी आजही लहान सहान गावांमधून मूलभूत शिक्षणाचा आणि तत्सम व्यवस्था पोहचल्या नाही आहेत किंवा त्यांचा लाभ विविध कारणांमुळे सर्वांना घेता येत नाही. तरीही प्रतिकूल परिस्थितीतून अनेक युवा आपली प्रगती साधताना दिसतात. सोशल मिडीयाचा अवाजवी वाढता प्रभाव, मॉल संस्कृतीची चटक, कोणत्याही गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्याने निर्णय घेण्यात येणारा तणाव, काही प्रमाणात पालकांच्या उंचावलेल्या अपेक्षा वगैरे असंख्य आव्हाने पेलून आजचा युवावर्ग सातत्याने काहीतरी नवीन शिकण्याचा आणि करण्याचा प्रयत्न करत आहे.अशा या युवाशक्तीचे संघटन करून एकमेकांच्या साहाय्याने एक परिपूर्ण सुंदर राष्ट्र घडविण्याचा आपण सारे निश्चित करूया.

Sanvi Oak ( सान्वी ओक )

http://linkmarathi.com/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b5/
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular