निगुडगे ( प्रतिनिधी ) – गेल्या दीड -दोन वर्षांपासून शाळा बंद असल्या कारणाने लहान मुलांच्या मध्ये नैराशाचे वातावरण पसरले आहे हाच धागा पकडून मुलांच्यात नवचैतन्य येण्यासाठी कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहु प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने निंगुडगे गावातील सेंट्रल स्कूल निंगुडगे गावातील लहान मुलांना पोषणयुक्त खाऊंचे वाटप करण्यात आले. या सामजिक उपक्रमासाठी प्रतिष्ठानचे सहसचिव शैलेश बाळासाहेब मगदूम यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना देसाई,दीपिका देसाई,गीता जंगम,अनिता देसाई,सरपंच के.बी. कुंभार ,बसवंत पाटणे,तानाजी पाटणे शिक्षक स्टाप आणि ग्रामपंचायत स्टाप उपस्थित होता.या केलेल्या कार्याबद्दल शाळेकडून व निंगुडगे ग्रामस्थांकडून आभार व कौतुक करण्यात आले
मुख्यसंपादक