परवा कुठल्याश्या मालिकेत शेजारची .....
तिच्या मैत्रिणीकडे विरजण मागायला येते .
सोसायटी हायफाय पण वातावरण अगदी चाळवजा ! एकमेकांशी संबंध अगदीच घरोब्याचे .
गोष्ट , अगदी किरकोळ पण खरेच विचार करायला लावणारी , त्यातूनच पुर्वीच्या चाळीविषयी च्या आठवणी जागृत झाल्या !
आमच्या घरी दूध , दही मुबलक , सुबत्ता खुप त्या मुळे लोक सतत काहीतरी मागायला येत. आई , आजी ही त्यांना जमेल तशी मदत करत !
पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या अडी - अडचणी अगदीच चुटकीसरशी सोडवत ! सदानकदा चोवीस तास दार उघडे ! हक्काने काय हवे नको ते मागून घेत ! वेळप्रसंगी मदतीला तत्पर असणारे शेजारी - पाजारी
आजकाल माणसाला सगळी सुखे पायाशी लोळण घालतात तरीही मन ताजेतवाने नसते ...याचे कारण असे की , मन मोकळे करायला त्यांच्याकडे नसणारा वेळ
सदानकदा मेट्रोसिटीत घट्ट पाय रोवून धरण्यासाठी धावाधाव ! कामाचा ताणतणाव यातूनच होणारी चिडचिड
दगदग !
आजही खेड्या - पाड्यातील बायका कधी काही मागण्याच्या हेतूने आपल्या सखीच्या घरी जाऊन संदेशाची देवाण - घेवाण करतात . विरजण मागण्याचे हे फक्त निमित्त असते ! त्यातूनही घरातील काही पेच प्रसंगाची एकमेकांकडे देवाण - घेवाण होते हा त्यामागील हेतू !
विरजण हा शब्दच माझ्या मनाला इतका भावला की बघा ना त्यात दुधाचे दही ....दह्याचे ताक ....ताकाचे लोणी ...
लोण्याचे तूप ….हा हा हा
…..काय ती व्याप्ती ! फक्त योग्य ती सरमिसळ
झाली की आपोआप सगळे जुळून येते! ….
आणि ….आणि अशीच
सरमिसळ नात्याची ही होते . त्यातूनच मोठे कुटुंब , घराणी , वंशावळ जन्माला येते ..!
आज इंग्रजी कॅलेंडर
प्रमाणे वर्षाचा शेवटचा दिवस ! या वर्षात आपण
नक्की काय काय गमावले
कुठे चुकलो याचा आढावा घेऊन नवीन वर्षाचा संकल्प करावा !
आपले हिंदू नवं वर्ष जरी चैत्र पाडवा ला सुरू होत
असले तरी आपण लोक उत्सवप्रिय असल्याने आपल्याला हे एक निमित्तच !
तर मंडळी या वर्षाचा आपण एक नवीन संकल्प करू नात्यातील मैत्रीतील विरजण अधिकाधिक दृढ करायचा ! एकमेकांपासून न दुरावण्यासाठी काय करता येईल याचा !
स्वतः सुखी समाधानी राहून , इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करू . जीवन हे फुलांसारखे मानले आहे . गुलाबाचे फुल उत्तमच आहे ! प्रेमाचे प्रतिक मानले गेले . पण झेंडूच्या फुलाचं ही महत्व काही कमी नाही . नवरात्रीला देवीला तेच लागते . तसाच प्रकार नात्यात , मैत्रीत ! भेदभाव हा नसावा ! कोणी छोटा , कोणी मोठा नाही...!
शब्दांनीच मनुष्याचे व्यक्तिमत्त्व घडते म्हणून त्याचा वापर ही संयमाने , गोडीगुलाबीने करावा !
आपली तर्जनी जेंव्हा दुसरा दोषी आहे म्हणून त्याला दाखवते तेंव्हा उरलेली तीन बोटे आपल्याकडे वळलेली असतात , याचे भान आपल्याला असावे !
समोरचा माणूस कसा वागायला हवा हे आपल्या हाती नसते पण आपण कसे वागायला हवे हे आपण निश्चितपणे ठरवू शकतो . तर चला मंडळी ....मनातील नकारार्थी विचारांना तिलांजली देऊन नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करू ......!
खेळात ज्या प्रमाणे हार - जीत असते , त्याच प्रमाणे ....जीवन हा दोन घडीचा डाव आहे . त्यात अनेक चढ - उतार असणार !! यशाने हुरळून जाऊ नका ! अपयशाने खचू नका ! उद्या काय घडेल याची शाश्वती नसते म्हणूनच आलेल्या प्रत्येक दिवसाला , प्रत्येक क्षणाला आनंदाने सामोरे जायचे ! आणि म्हणूनच .
नात्यातील – मैत्रीतील विरजण अधिकाधिक घट्ट कसे होईल याचा संकल्प नवीन वर्षाच्या निमित्ताने करू !!! ….
जॉब शोधताय…? मग तुम्ही योग्य msg वाचत आहात. अश्याच प्रकारचे नानाविध सरकारी आणि खाजगी जॉब अपडेट अगदी मोफत मिळवण्यासाठी खालील फेसबुक ग्रुप जॉईन करा…
https://www.facebook.com/groups/2574733692753005/?ref=share
©️®️सौ. राजश्री भावार्थी
पुणे
मुख्यसंपादक