Homeमुक्त- व्यासपीठव्यवहारी झाली माणसं…

व्यवहारी झाली माणसं…

जिवाभावाचे नाते संपुष्टात आले हो आजकाल
व्यवहारी लोकच जवळची झाली या जगात

व्हॉट्सअॅपवर गुडमॉर्निंग करतात आणि
देवाला नमस्कार न करताच घराबाहेर पडतात

एफ बी वर दिवसभर ऑनलाईन राहतात
पण घरात उपस्थित असून मोबाइलमध्ये रमतात

जिवाभावाचे नाते संपुष्टात आले हो आजकाल
व्यवहारी लोकच जवळची झाली या जगात

ऑफिसमध्ये पुढच्या पदांसाठी धावता धावता
कित्येकदा समोरच्याच्या भावना दुखावता

भेटणाऱ्या पाच अंकी पगारावर
कमी पदावरच्या लोकांची लाज दाखवतात

जिवाभावाचे नाते संपुष्टात आले हो आजकाल
व्यवहारी लोकच जवळची झालेत या जगात

लिव्हिंग रिलेशन नो लव नो इमोशन्स
असते फक्त अॅडजेस्टमेंट

पटेल तोवर अटॅचमेंट
नाहीतर तू कोण आणि मी कोण

जिवाभावाचे नाते संपुष्टात आले हो आजकाल
व्यवहारी लोकच जवळची झालीत या जगात

सुखाच्या वेळी बरोबरीच्या लोकांना देतो मानसन्मान
दुःखात मात्र तोच हाताला घडी मारत उभा असतो लांब

जिवाभावाचे नाते संपुष्टात आले हो आजकाल
व्यवहारी लोकं जवळची झाली या जगात

मित्राच्या सुखाचा विचार करता करता
तो मात्र स्वार्थ साध्य करतो

प्रॉपर्टीसाठी भाऊ बहिणीला विसरतो
पैशासाठी रक्ताच्या नात्याचं ही गळा गोठतो

जिवाभावाचे नाते संपुष्टात आले हो आजकाल
प्रभारी लोकच जवळची झालीत या जगात

नवरा बायकोही झालेत खूप प्रॅक्टिकल
मुलांसाठी फक्त एकत्र राहण्याची असते धडपड

गरजेपुरता एकमेकांना भेटतात
कित्येकदा एकाच घरात राहूनसुद्धा दूरच असतात

जिवाभावाचे नाते संपुष्टात आले हो आजकाल
व्यवहारी लोकच जवळची झाली या जगात

कवयित्री – नेहा नितीन संखे
( बोईसर )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular