Homeमुक्त- व्यासपीठशिवकालीन प्रतापगड

शिवकालीन प्रतापगड

पुणे गावी वाई पुढे
वसे शिवकालीन गड
नाव त्याचे अद्भुत असे
सह्याद्रीतील प्रतापगड

पायथ्यापासून बुरूजापर्यंत
विस्तारलेला नक्षीदार गाभा
गडाच्या तटबंदी तटावर तो
भगवा हिंदूंचा डौलात उभा

आख्यायिका अफजलखान
भेटीची इतिहासपूर्व घडली
वीर छत्रपतींची शौर्य गाथा
पूर्वजांनी निक्षून सांगितली

http://linkmarathi.com/देवगिरी-किल्ल्याचा-इतिहा/

सहा फूट उंच धिप्पाड शरीर
वर्णिले अफजलखानाचे गान
शूर सेनानी मराठी मावळ्यांची
गायली अफाट कीर्ती महान

हिरवी झाडी सुंदर वलयातून
फुलते विविधांगी सुलक्षणा
ठिकठिकाणी आढळतात
राजांच्या वास्तवातील खुणा

राजे आजही गडावर असल्याचे
भास आभास आम्हास होतात
राजांच्या चपखल युद्धनितीचे
नगारे सनईच्या सुरात वाजतात

http://linkmarathi.com/श्री-धारेश्वर-स्वयंभू-दे/

गडाच्या निघणाऱ्या पाऊलवाटेने
सूक्ष्म नजर चोहोबाजूस फिरते
बारा ही महिन्यांच्या ऋतुत सृष्टी
मानवाविना पावित्र्य गडाचे राखते

कवी : नयन धारणकर, नाशिक

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular