Homeबिझनेसशिवकृपा सहकारी पतपेढी लि . मुंबई

शिवकृपा सहकारी पतपेढी लि . मुंबई

शिवकृपा सहकारी पतपेढी लि . मुंबई या संस्थेची स्थापना 1982 साली विक्रोळी ( मुंबई ) येथे झाली. संस्थेची स्थापना करण्याची संकल्पना शिवमंदिर मध्ये सुचली म्हणून संस्थेचे नाव शिवकृपा असे ठेवले. एक प्रशासकीय कार्यालय , 7 विभागीय कार्यालये तसेच 100 शाखा आज संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असून त्यातील 42 शाखा ह्या संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. शिवकृपा च्या विक्रोळी , गोरेगाव , ठाणे , पुणे , सातारा , कोरेगाव , माळशिरस या ठिकाणी आलिशान विभागीय कार्यालये असून प्रत्येक विभागात एक विभागीय अधिकारी नेमले आहेत. महाराष्ट्र मध्ये एकूण 742 कर्मचारी असून त्यांच्यात 105 विशेष वसुली अधिकारी काम करतात . कोरेगाव येथे संस्थेचे स्वतःचे निवासी प्रशिक्षण केंद्र आहे.
संस्थेचा एकूण 3917 कोटींचा संमिश्र व्यवसाय झाला आहे ( 28 फेब्रुवारी 2022 )
यामध्ये ठेवी – 2167 कोटी आणि कर्जे – 1750 कोटी आहेत. संस्थेची गुंतवणूक 792.28 कोटी आहे. शिवकृपा चा एकूण निधी 279.88 कोटी आहे. संस्थेची सभासद संख्या जवळपास 3, 58, 755+ आहेत . त्यांना सतत ऑडिट अ वर्ग मिळालेला आहे.
संचालक व कर्मचाऱ्यांना आचारसंहिता लागू आहेत . ग्राहकांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येते. कर्जमंजुरीची प्रकरणे संचालक मंडळाच्या साप्ताहिक बैठकीत सादर केली जाऊन त्यांना मंजुरी दिली जाते . दर आठवड्याला जवळजवळ 14 कोटीची कर्जे मंजूर होतात . वितरण ,वसुली , आणि लेखापरिक्षण इत्यादी बाबीवर देखरेख ठेवण्यासाठी संचालकांच्या वेगवेगळ्या समित्या आहेत . पुणे व सातारा येथील विभागीय कार्यालये प्रशासकीय कार्यालयाशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जोडण्यात आलेली असून त्याचा उपयोग प्रशिक्षण , बैठका व मुलाखतीसाठी केला जातो.
आर्थिकदृष्ट्या अतिशय अडचणीत असणाऱ्या दादासाहेब साखवळकर पतसंस्था मर्या , ओमकार को ऑप क्रेडीट सोसायटी , कुलस्वामी भैरवनाथ बिगरशेती ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या अश्या संस्था शिवकृपा मध्ये विलीन करण्यात आल्या आहेत. शिवकृपा संस्थेला महाराष्ट्र शासनाचा सण 2016 -17 सालचा प्रतिष्ठित सहकार भूषण पुरस्कार प्राप्त झाला , त्याचप्रमाणे सप्टेंबर 2009 मध्ये महाराष्टातील 1 नंबर ची आदर्श व अग्रगण्य पतसंस्था म्हणून शिवकृपा चा गौरव केला. 2017 , 2018 ,2019 मध्ये सहकारातील उत्कृष्ट कामकाजाकरीता दिपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे असे नानाविध पुरस्कार शिवकृपा ला मिळाले आहेत. संस्थेने 2017 साली रबाळे नवी मुंबई येथे भव्यदिव्य प्रशासकीय कार्यायल 11 गुंठे चा भूखंड खरेदी केला असून या भूखंडावर तळमजला + 6 मजल्याचे शिवकृपा भवन उभारण्यात आले आहे.

सामाजिक कार्यात शिवकृपाचा लक्षणीय सहभाग

उत्तराखंडमध्ये झालेल्या महाप्रलयात तसेच केरळमध्ये झालेल्या त्सुनामी वादळामुळे बाधित झालेल्या लोकांकरिता 51 हजार रु. व 25 हजारांची प्रधानमंत्री सहाय्यता निधीस संस्थेने  आर्थिक मदत केली. 

कोविड 19 वेळी 41 लाखांचा धनादेश राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे प्रदान करण्यात आला .

संस्थेने सामाजिक वनीकरण मध्ये भरीव कामगिरी केली आहे सुमारे 1 लाख पारंपरिक वृक्षाची लागवड मान खटाव या दुष्काळी भागात केली आहे .

सातारा , सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात अनेक गावांत सुमारे 2000 नागरिकांना चादरी , बेडशीट व गृह उपयोगीवस्तू तसेच विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू , आणि 50 , 000 वह्यांचे वाटप करण्यात आले होते.

जर आपल्याला शिवकृपा पतसंस्था मध्ये ठेवी , दैनंदिन ठेव /पिग्मी ठेवण्याची इच्छा असेल तर संपर्क साधू शकता – 8421666667

शिवकृपा पतपेढी मध्ये कर्जासाठी लागणारी कागदपत्रे

1) सिबील
2) रेशनकार्ड , आधारकार्ड , पॅनकार्ड
3) कर्ज कारण खुलासा
4) दैनंदिन पासबुक झेरॉक्स
5) व्यवसायाचा फोटो
6) व्यवसाय परवाना
7) व्यवसाय जागेचा भाडेकरार
8 ) अद्यावत बँक स्टेटमेंट
9 ) उत्पन्न पुरावा / ITR
10 ) फोटो

जामीनदारांची कागदपत्रे

   नोकरदार 2 

1) रेशनकार्ड ,
आधारकार्ड , पॅनकार्ड झेरॉक्स 2 , आयडेंटिटी फोटो 4

2) कंपनी ओळखपत्र

3) पगार पावती / पेमेंट स्लिप ( मागील 4 महिने )

4) आद्यवत बँक स्टेटमेंट (6 महिने )

संकलन – अमित अशोक गुरव ( आजरा , कोल्हापूर )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

4 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular