Homeघडामोडीशिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उपविभागीय समन्वय पदी महेश भादवणकर यांची निवड

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उपविभागीय समन्वय पदी महेश भादवणकर यांची निवड

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कडून निवडीचे पत्र

प्रतिनिधी:-वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष गडहिंग्लज, आजरा,चंदगड उपविभागीय समन्वयक पदी महेश भादवणकर यांची निवड करण्यात आली.
सीमाभागातील तालुक्यातील गोरगरीब जनतेला वैद्यकीय मदत पोचावी आणि एकही रुग्ण उपचाराविना राहू या साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार कक्ष प्रमुख राम राऊत यांनी ही निवड केली.
वैद्यकीय कक्षाने अवघ्या 9 महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी च्या मार्फत ६२०० रुग्णांना ५०कोटी ५५ लाख रुपयांची भरघोस मदत दिली आहे.


गडहिंग्लज, चंदगड, आजरा पश्चिम महाराष्ट्र च्या टोकाकडील शेवटचे तालुके आहेत वैद्यकीय मदत सर्वांच्या पर्यंत पोचावी या साठी ही निवड महत्वाची मानली जात आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजी पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.


यावेळी मुख्यमंत्री सहाय्याता निधी प्रमुख तथा मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, वैद्यकीय कक्ष संपर्क प्रमुख जितेंद्र सातव, वैद्यकीय कक्ष कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रशांत साळुंखे, वैद्यकीय कक्ष कोल्हापूर शहर प्रमुख कृष्णा लोंढे आदी उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular