आमच्या असंख्य वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा .
लक्षदीप
लक्ष दिपांनी फुलवीत आल्या आज दीपमाला,
स्वागत करण्या दिपावलीचे तारकाच अवतरल्या.१
दिपावलीच्या शुभ क्षणी प्रकाशाने अवनी शृंगारली,
दिपज्योतीनी उजळुनी धरा ही नंदनवन शोभली.२
अंधकार हा मिटविण्यासी लक्षदीप उजळती,
नक्षीदार सुंदर रांगोळ्यांनी अंगणे सजविती.३
स्वाद घेऊनी फराळाचा शुभेच्छा परस्परांशी देती.
राजा रंक भेद विसरूनी आनंद दिपावलीचा घेती .४
मनोभावे करूनी उपासना देवी श्रीलक्ष्मीची ,
करीती कामना धन,ऐश्वर्य आणि संपंन्नतेची.५
अंधार मिटवुनी दुःखाचा प्रकश आनंदाचा येवो,
चैतंन्याच्या अनुभूतीने जीवनात समृद्धी येवो.६
दिपावलीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
कवी. श्री रेवाशंकर वाघ ठाणे .
मुख्यसंपादक