ऐ प्रिय,लता आणि सचिन
तुम्हाला मिळालाय भारतरत्न या देशातून
कृषिप्रधान या देशात बेजबाबदार वक्तव्याने
तुम्ही उतरलात भारतीयांच्या मनातून
क्रिकेटच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडणारा तू
अन् मंजूळ आवाजानं रसिकांना वेड लावणारी लता
जगाचा हा पोशिंदा शेतकरी
जाणून घ्या रे याच्याही जगण्याच्या व्यथा
तुमच्यापेक्षा रिहाना आणि ग्रेटा बरे
शेतकरी आंदोलनाची चर्चा होतेय परदेशातून
देश महत्वाचा तर आहेच भारतरत्नांनो
पण याच कृषिप्रधान देशात आंदोलन घडतयं
जगाचा पोशिंदा शेतकऱ्याच्या हातून
आटवून रक्त काळ्या मातीत
रत्न उगविणारा हा शेतकरी
न्याय,हक्क अन् जीवंत राहण्यासाठी
लढतोय आज सरकार दरबारी
करोडोंच्या या देशात तुम्ही नसला तरी
तुमच्या सारखे रत्न उद्या लाखोनं घडतील
पण हा शेतकरी जर संपला
तर हेच रत्न उद्या उपाशी मरतील
बोलतात तुम्ही पैशाच्या बळावर अगदीच बेधडक
वरदहस्त तुमच्यावर त्या माजोरी सत्तेचा
हे शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदा
विषय झालाय या कृषिप्रधान देशात
सेलिब्रिटी अन् राजकारणी यांच्यापुढं चेष्टेचा…!
- संदीप देविदास पगारे
मु.पो.खानगाव थडी – नांदूर मधमेश्वर-नाशिक

मुख्यसंपादक