Homeमुक्त- व्यासपीठश्रद्धा आणि अंधश्रद्धा

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

    खरं तर महाराष्ट्राला "संतांची भूमी", "वीरांची भूमी," "शुरांची भूमी" म्हणून ओळखतात. परंतु आज याच संतांच्या महाराष्ट्रात निरपेक्ष श्रध्देला धनसंपत्ती, चंगळवाद, खोट्या प्रतिष्ठेचे माप लावणारे काही बोगस साधु निर्माण झाले आहेत. मग खरी श्रध्दा म्हणजे काय ? हा प्रश्न पडतो.                         श्रध्दा आणि अंधश्रद्धा यातील मुख्य फरक म्हणजे भक्ती असेल तर श्रध्दा आणि नसेल तर अंधश्रद्धा. आपण पाहतो, प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा अंधश्रध्देच्या आहारी जातात, शिकलेली असूनही मग कुठे जाते ही सगळी शिकवण...?

     आपण देवावर श्रद्धा ठेवून उपवास करतो पण आपल्याला नेमके ठाऊक नसते उपवास म्हणजे काय? उपाशी पोटी राहून परमेश्वराचे आर्त नामस्मरण करणे की, उपवास आहे म्हणून नुसते खाण्याकडेच लक्ष जास्त असते. खरंच आपणच आपल्या मनाला विचारुन पहा. भूक लागली तर आपले मन कुठे जाते... परमेश्र्वराकडे की भुकेकडे? आणि हे आजपर्यंत समजले नाही की, उपवासाच्या दिवशी अमुक अमुक खावे...की, खावू नये. 

     आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे नवरात्रीमध्ये बरेच भाविक कडक उपवास करतात. नऊ दिवस सात्विक आहार घेतात. पण, तिकडे कलकत्त्यामध्ये नवरात्रीत मांसाहार करतात; तिकडे कसा चालतो? बऱ्याचदा काही भाविकांचा देव दर्शनाला जाताना अपघात होतो. तो का? ते तर त्याच्या दर्शनाला चाललेले असतात मग तो त्यांच्याशी असा दुष्मनसारखा का वागतो? कसलाही विचार न करता आपण लगेच कोणावर तरी किंवा कशावर तरी विश्वास ठेवतो त्याला "अंधश्रद्धा" म्हणतात. धर्म ग्रंथात म्हटले आहे की, जी बदलते ती "श्रध्दा" आणि कायम असतो तो "विश्वास" ! 

मग आता तुम्हीच सांगा, तुमचा देवावर विश्वास आहे की श्रद्धेवर ? जर विश्वास असेल तर वर्षातील बारा महिन्यातील बारा सण तुम्ही केलेच नसते, याचे कारण असं की, तुमचा तुमच्या आई-वडिलांवर विश्वास आहे की, श्रद्धेवर? याचं उत्तर असेल, विश्वास. देव वाराप्रमाणे नवस पूर्ण करत असता तर आज महाराष्ट्रात घरोघरी वारकरी दिसले असते. संतांची भूमी, कीर्तन, भजन, नामघोषाने पवन झाली असती पण, आम्हाला उपासना कोणाची करायची हेच माहित नाही.
उगीचच एखाद्या दगडाला देव मानून पूजा करण्यात काय अर्थ? लोकांची श्रद्धा !!
याला काय बोलणार?

“राधे मा”, आसारामबापू यासारखे बोगस संत समाजाला भरकटवत ठेवतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. देव-देव म्हणजे नेमके काय, हे आजच्या पिढीला समजावणारे कोणी तरी असले पाहिजे.
लोकांच्या डोळ्यासमोरील अंधश्रध्देची पट्टी आजही तशीच बांधलेली आहे. समाज सुधारण्यासाठी आजच्या संतांनी काम केले नाही तरी से पण श्रध्दा आणि अंधश्रद्धा यातील फरक भाविकांना समजावून दिला पाहिजे.
आजही आपल्या विज्ञान विकसित देशात नरबळी, मुठकरणी, वशीकरण यासारखे प्रकार घडताना दिसतात. कालानुरूप जरी श्रध्दा बदलली तरी श्रद्धातील वास्तव कोणालाच बदलता येणार नाही.

लेखिका- सुनेत्रा प्रशांत नगरकर
( अहमदनगर )

http://linkmarathi.com/आणि-कविता-जिवंत-राहिली/

दररोजच्या पोस्ट सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच खालील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला Like आणि Follow करा
👇
.
.
.

🟦facebook:-
https://www.facebook.com/Link-Marathi-114377503760034/

🟪instagram:-
https://instagram.com/link.marathi?utm_medium=copy_link

🟢website -: www.linkmarathi.com

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular