Homeघडामोडीश्री यमाई देवी औंधचा चैत्र उत्सव साधेपणाने संपन्न

श्री यमाई देवी औंधचा चैत्र उत्सव साधेपणाने संपन्न

औंध (प्रतिनिधी ) – श्री मूळपीठ यमाई देवी औंध जिल्हा सातारा एक प्रख्यात शक्तीपिठ.पाच दिवस साजरा होणारा चैत्री उत्सव. सालाबाद प्रमाणे साजरा होणारा चैत्री उत्सव, चैत्र पौर्णिमेनंतर चैत्र कृष्ण १ ते पंचमी असा पाच दिवसाचा. हा चैत्री आज उत्सव संपन्न झाला .
चैत्र उत्सवाचा महिना.
चैत्र महिना हा उत्सवाचा महिना !
जयंती सणांचा मास आहे विविध धर्मातील महत्वाचे सण, जयंती या महिन्यात होत असतात. गुढीपाडव्याला होणारा शिवपार्वती विवाह व त्या अनुषंगाने गावागावांमध्ये होणारे उत्सव यात्रा यांना लोकविधि व लोक परंपरेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. या लोकपरंपरेत एक महत्वाची यात्रा म्हणजे औंधचा चैत्र उत्सव !
हा उत्सवामध्ये देवीच्या रोजच्या सालंकृत पूजा, विविध वाहनावर आकर्षक सजावटीसह गुरव पुजारी बांधतात. धार्मिक विधीत सकाळी देवीची भूपाळी, जलाभिषेक, देवीस्तुती, पोथीवाचन, त्रिकाळ आरती, भजन, महानैवेद्य इत्यादी कार्यक्रम पार पडतात .चौथ्या, पाचव्या दिवशी आंबील प्रसादाचे वाटप केले जाते. पोर्णिमेला होणारी ज्योतिबा यात्रा पार करून माघारी आलेले लोक त्याचप्रमाणे खरसुंडी सिद्धनाथ यात्रेला जाणारे लोक, आसपासच्या यात्रांना हजेरी लावण्यासाठी जाणारेअनेक लोक औंधच्या या उत्सवात आपली हजेरी लावत .
या अनुषंगाने श्री यमाई ,अंबाबाई कोल्हापूर, अंबा भवानी, ज्योतिबा, खंडोबा, मसवड सिद्धनाथ, खरसुंडी सिद्धनाथ ,जेजुरी खंडोबा या देवतांचे व त्यांच्या पराक्रमाचे स्मरण केले जाते.

कोरोना पा१र्वभूमी व उत्सवातील साधेपणा
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साधेपणाने साजरा झाला. सर्व धार्मिक विधी ,नित्यकर्मे देऊळ पुजारी गुरव , सचिन पछाडे अवधूत पछाडे यांच्या हस्ते व पंचमी उत्सवदेवस्थान पदाधिकारी, वहिवाटदार गुरव, पाच पुजारी राजेंद्र गुरव, श्लेंद्र गुरव, गणेश गुरव, रमेश गुरव,संदीप गुरव यांच्या उपस्थितीत पार पडले.
कोरोच्या महामारीच्या संकटातून सर्व जगाची सुटका व्हावी .लोकव्यवहार पुन्हा मूळ पदावर यावेत व सर्वांना सुख शांती व आरोग्यपूर्ण जीवन मिळावे अशा प्रकारची प्रार्थना श्री यमाई देवी चरणी पाच पुजारी यांच्या मार्फत करण्यात येऊन उत्सवाची सांगता झाली.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular