Homeवैशिष्ट्येश्र्लोका मेहताच्या चाळीस हजारांहून महाग सुंदर ड्रेसची चर्चा | Discussion of Shloka...

श्र्लोका मेहताच्या चाळीस हजारांहून महाग सुंदर ड्रेसची चर्चा | Discussion of Shloka Mehta’s beautiful dress costing more than forty thousand |

श्र्लोका मेहताच्या चाळीस हजारांहून महाग सुंदर ड्रेसची चर्चा |

अंबानी कुटुंबाची सून म्हणजेच आकाश अंबानी याची पत्नी असलेली श्लोका मेहता विविध कारणांवरुन नेहमीच चर्चेत असते. तिच्या फॅशन सेन्सबाबतही कायम चर्चा होताना दिसते. यामध्ये ती परीधान करत असलेले कपडे, ज्वेलरी यांचे पॅटर्न आणि किंमत याविषय बरेचदा चर्चा होते. श्लोका नेहमीच हटके फॅशनमध्ये स्वत:ला अतिशय छान कॅरी करताना दिसते. फॅशनच्या बाबतीत ती बरेच प्रयोगही करत असते. दुसऱ्यांदा आई होत असलेली श्लोका नुकतीच आपले सासरे मुकेश अंबानी, पती आकाश अंबानी आणि मुलगा पृथ्वी यांच्यासोबत सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी गेली होती. काही वेळातच अंबानी कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

श्र्लोका मेहताच्या चाळीस हजारांहून महाग सुंदर ड्रेसची चर्चा |
श्र्लोका मेहताच्या चाळीस हजारांहून महाग सुंदर ड्रेसची चर्चा |


यामध्ये श्लोकाने अतिशय सुंदर असा पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट असलेला ड्रेस घातल्याचे दिसले. गर्भवती असताना आणि बाहेर इतका उकाडा असताना हलका फुलका असा हा ड्रेस श्लोकावर छान उठून दिसत होता. Yavi या ब्रँडच्या या ड्रेसमध्ये श्लोका फारच सुंदर दिसत होती. या ड्रेसच्या बाह्या थ्री फोर्थ असल्याचे तिच्या काही व्हिडिओ आणि फोटोमध्ये दिसत आहे. तिच्या एका बाजूला आकाश अंबानीने मुलगा पृथ्वीला खांद्यावर बसवले आहे. तर दुसऱ्या बाजूला मुकेश अंबानी असल्याचे दिसते. यावेळी श्लोका अतिशय मनोभावे सिद्धिविनायकाचे दर्शन घेत असल्याचे दिसत आहे.
तिने घातलेल्या या कुर्त्याची ऑनलाइन किंमत २३,९०० इतकी असून श्लोकाने स्ट्रेट फ्लोरल पँटवर हा टॉप पेअर केला आहे. या पँटची किंमत १६,५०० असल्याने या संपूर्ण ड्रेसची किंमत ४०,४०० इतकी आहे. यावर असलेली प्रिंट ही काश्मिरी पद्धतीच्या प्रिंटवरुन डिझाईन केल्याचे या कपड्यांच्या डीस्क्रीप्शनमध्ये दिसते. हे कापड सिल्कचे असून ते वजनाने अतिशय हलके असल्याचे दिसते. तर नुकत्याच झालेल्या निता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात श्वेता चिकनकारी स्कर्ट आणि हॉल्टरनेक ब्लाऊजमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. यामध्ये तिने आपले बेबी बंपही फ्लाँट केल्याचे दिसले.

श्र्लोका मेहताच्या चाळीस हजारांहून महाग सुंदर ड्रेसची चर्चा |
श्र्लोका मेहताच्या चाळीस हजारांहून महाग सुंदर ड्रेसची चर्चा |

अधिक माहिती

संदर्भ

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular