Homeघडामोडीसत्तांध झालेल्या बच्चू भाऊंना आता तरी उद्धवजींचा चांगुलपणा कळेल का ?

सत्तांध झालेल्या बच्चू भाऊंना आता तरी उद्धवजींचा चांगुलपणा कळेल का ?

आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात रुग्णशेवेतून, त्यागातून, व अंध ,अपंग दिव्यांग, दिन दुबळ्या, गरीब शेतकऱ्यांचे प्रश्न वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून मांडणारे अद्वितीय व्यक्ती महत्त्व, 99% समाजसेवा आणि एक टक्का राजकारण अशी भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले आदरणीय बच्चुभाऊ कडू यांचा जीवन प्रवास सर्वश्रुत आहे. गावात होणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने तमाशाचा फड बंद पाडणारे, गरीब मित्राला योग्य उपचार देऊन रक्तदान करून जीवनदान देणारे, आपल्या वेगळ्या शैलीने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर परिचित असणारे बच्चु भाऊ आपण आपल्या प्रहार नावाच्या संघटनेतून अनेक राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांवर प्रहार केला. लोकांना न्याय मिळवून दिला, अधिकाऱ्यांवर वचक बसवला इतकच काय कलम 353 व सेवा हमी कायद्याबद्दल लोकांना माहिती देऊन त्यावर काम केले, पंचायत समिती सदस्य पासून ते राज्यमंत्रीपदापर्यंत आपली घोडदौड कुठेच थांबली नाही, प्रहारचा एक कार्यकर्ता हजार कार्यकर्त्यांना भारी होता कुठल्याच कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारचा लाभ नसतानाही निवळ तुमच्या विचारधारेचा पाईक बनवून हा फाटका कार्यकर्ता संघटनेसाठी लढत राहिला, दिव्यांग बंधूंना निधी मिळावा म्हणून आपण व आपले कार्यकर्ते प्रयत्नपूर्वक लढले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल शेत पिकांच्या हमीभावाबद्दल शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आपण अभ्यासपूर्ण मते मांडत आलात, सरकारला पळो की सळो करून सोडण्याची ताकद आपल्या आंदोलनांमध्ये व भाषांणानमध्ये असायची, आपल्या सोबत असणारे मोजकेच कार्यकर्ते अभ्यासू पणे आपले विचार मांडायचे, आपण शेतकऱ्यांच्या दिल्ली येथे झालेल्या आंदोलनाला मोटर सायकलने जाऊन पाठिंबा दिला, हे सरकारच काय व्यवस्था बदलवण्याची धमक आपल्यामध्ये असताना आपण मंत्रिपदासाठी का लाचार झालात कळत नाही, आपणास माननीय उद्धवजी ठाकरे यांनी राज्यमंत्रीपदी चांगल्या प्रकारचे खाते दिले काम करण्याची संधी दिली त्यावेळेस प्रामाणिकपणे काम करून आपण मतदारसंघाला व राज्यातील सर्वांना न्याय दिला, मात्र कुठे मासी शिंकली की आपल्यासारखा लोखंडाला वितळण्याची ताकद ठेवणारा नेता, पाषाणाला पाझर फोडणारा नेता कसा विरघळला, शिंदे गटाचा जन्म होताना आपण शिंदे गटाच्या सोबत होता आणि महत्वाची भूमिका पार पाडत होतात तरी या शिंदे गटाने आपणास मंत्रीपद दिले नाही, कारण गद्दारीला उत्तर गद्दारीनेच मिळते हे सिद्ध झाले मी आपला कार्यकर्ता म्हणून आपणास विनंती करतो आपण पुन्हा एक वेळा विचार करून सत्तेची, मंत्रिपदाची, धुंदी मनातून काढून उद्धव साहेबांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आत्मपरीक्षण करा आणि उद्धवजींच्या चांगुलपणाचा पुन्हा विचार करून साहेबांच्या सोबत राहा, परत या परत या

                       संतोष पाटील
                   
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular